ठाणे : दिवाळीच्या सणानिमित्ताने बच्चे कंपनीकडून घराच्या अंगणात मातीचा किल्ला उभारण्याची महाराष्ट्रात परंपरा ( tradition of building mud fort in Diwali ) आहे. किल्ला उभारणीसाठी बच्चे कंपनी आठ दिवस मेहनत करून किल्ला उभारून त्यावर छत्रपती शिवरायांसह मावळ्यांचे लहान पुतळे ठेवून एकाद्या ऐतिहासिक किल्ल्याची कलाकृती उभारतात. मात्र अश्याच एका बच्चे कंपनीच्या किल्ल्यावर फणा काढून कोब्रा नागाने कब्जा केल्याची घटना घडली ( cobra snake found in fort ) आहे. ही घटना कल्याण पश्चिम भागातील सापड गावात घडली असून या कोब्रा नागाला पाहून भयभीत झालेल्या बच्चे कंपनीने धूम ठोकली.
किल्ल्यात कोब्रा नाग आढळला : बदलत्या हवामानामुळे विषारी, बिन विषारी साप भक्ष्याच्या शोधात मानवी वस्तीत शिरत असल्याच्या घटना घडतच आहे. त्यातच कल्याण पश्चिम भागातील सापड गावात मढवी कुटूंब राहते. त्यांच्या कुटूंबातील ४ ते ५ मुलांनी मातीचा किल्ला घराच्या अंगणात उभारला आहे. या किल्ल्याच्या खालच्या बाजूला बिळासारख्या जागेत कोब्रा नाग शिरला होता. मात्र तोपर्यत ही बच्चे कंपनी खेळण्यात गुंग होती. काही वेळाने बच्चे कंपनी किल्लावर संध्याकाळची रोषणाई करण्यासाठी तयारी करत असतानाच, हा कोब्रा नाग अचानक किल्ल्यात दिसला. या कोब्रा नागाला पाहून मढवी कुटूंबाबतील बच्चे कंपनीने घाबरून धूम ठोकत, किल्ल्यात नाग असल्याची माहिती वडिलांनी दिली. त्यानंतर वडिलांनी सर्पमित्र हितेश करंजळकर याला किल्लावर कोब्रा नागाने कब्जा माहिती दिली.
सर्पमित्राकडून कोब्रा नागाची सुटका : माहिती मिळताच हितेश घटनास्थळी येऊन या कोब्रा नागाला किल्ल्यातून शिताफीने पकडून पिशवीत बंद ( Sanke catcher Rescue cobra snake ) केले. हा कोब्रा नाग इंडियन कोब्रा जातीचा असून साडे तीन फुट असल्याची माहिती सर्पमित्र हितेशने दिली. या कोब्रा नागाला कल्याण वन अधिकाऱ्याच्या परवानगीने जंगलात सोडून जीवदान दिल्याची माहितीही सर्पमित्राने दिली. दुसरीकडे ऐन दिवाळीच्या दिवशीच मढवी कुटूंबातील बच्चे कंपनीने उभारलेल्या किल्ल्यावर या कोब्रा नागाने कब्जा केल्याची चर्चा आता गावात रंगली आहे.