ETV Bharat / state

ठाण्यात लहान मुलांसाठी उभारले चिल्ड्रन बस शेल्टर - चिल्ड्रन बस शेल्टर न्यूज

शाळेच्या वाहनांची वाट पाहत असताना लहान मुलांना कधी कधी मुलांना ऊन-पाऊस-वाऱ्याचा त्रास सहन करावा लागतो. या पासून शाळकरी मुलांची सुटका व्हावी यासाठी ठाण्यात चिल्ड्रन बस शेल्टर उभारण्यात आले आहे.

चिल्ड्रन बस शेल्टर
चिल्ड्रन बस शेल्टर
author img

By

Published : Jan 10, 2020, 7:51 AM IST

ठाणे - शाळकरी मुलांना शाळेत जाताना रस्त्यांवर उभे राहून शाळेच्या बसची वाट बघावी लागते. यात कधी कधी मुलांना ऊन-पाऊस-वाऱ्याचा त्रास सहन करावा लागतो. या पासून शाळकरी मुलांची सुटका व्हावी यासाठी ठाण्यात चिल्ड्रन बस शेल्टर उभारण्यात आले आहे.

लहान मुलांसाठी उभारले चिल्ड्रन बस शेल्टर

नगरसेवक पूर्वेश सरनाईक यांच्या संकल्पनेतून प्रभाग क्रमांक चौदामध्ये पाच ठिकाणी हे चिल्ड्रन बस शेल्टर उभारले आहे. पहिल्या टप्प्यात दोस्ती विहार गृहसंकुल, कोरस नक्षत्र गृहसंकुल, रुणवाल प्लाझा गृहसंकुल या तीन ठिकाणी हे बस शेल्टर उभारण्यात आले होते. त्यानंतर डवले नगर बस डेपो, वर्तक नगर येथेही चिल्ड्रन बस शेल्टर केले आहेत.

हेही वाचा - 'साहित्य संमेलनाला जाऊ नका' संमेलनाचे उद्घाटक ना. धों. महानोर यांना धमकी
शाळेमध्ये जाताना लहान विद्यार्थ्यांना आनंद मिळावा आणि त्यांना शाळेची आवड निर्माण व्हावी यासाठी या प्रयोगाचा फायदा होत आहे. मुलांच्या आवडीच्या कार्टून्सचा वापर करून हे बस शेल्टर तयार केले आहेत. लवकरच राहिलेल्या ठिकाणी बस शेल्टर उभारण्यात येतील, अशी माहिती पूर्वेश सरनाईक यांनी दिली.

Intro: ठाण्यात लहान मुलांसाठी उभारले चिल्ड्रनस बस शेल्टरBody:

शाळकरी मुलांना शाळेत जाताना घरातून रस्त्यांवर उभे राहून शाळेच्या बसची, व्हॅनची वाट बघावी लागते. उन्हाळ्यात , पावसाळयात मात्र मुलांसह त्यांच्या पालकांची देखील तारेवरची कसरत होत असते. पावसाळ्यात हवेमुळे छत्र्या उडतात त्यामुळे शाळेत जाण्याच्या आधीच मुले चिंब भिजुन जातात. तर उन्हाळ्यात तळपत्या उन्हात उभे राहावे लागत असल्यामुळे शाळेत जाऊच नये असे चिमुरड्याना वाटत असते. यासाठी फक्त लहान मुलांकरीता बस शेल्टर उभारण्याची संकल्पना नगरसेवक पूर्वश सरनाईक याना आली. त्यावेळी त्यांनी चिल्ड्रन बस शेल्टरमध्ये मुलांना कसे आकर्षित वाटेल त्यासाठी त्यांच्या आवडीचे कार्टून्सचा वापर करून ते बस शेल्टर तयार केले.
प्रभाग क्रमांक १४ मध्ये आता पर्यंत पाच ठिकाणी हे चिल्ड्रन बस शेल्टर उभारण्यात आले आहे. अगोदरच्या टप्प्यात तीन ठिकाणी म्हणजेच दोस्ती विहार गृहसंकुल, कोरस नक्षत्र गृहसंकुल, रुणवाल प्लाझा गृहसंकुल या ३ ठिकाणी हे बस शेल्टर उभारण्यात आले होते आणि आता रविवार दि. ५ जानेवारी २०२० रोजी डवले नगर येथील बस डेपोच्या समोर आणि दुसरे वर्तक नगर येथील लक्ष्मी नारायण मंदिर येथे उभारण्यात आले तर लवकरच अन्य उरलेल्या दोन नुकते हे बस शेल्टर उभारण्यात येतील असे मत नगरसेवक पुर्वेश सरनाईक यांनी सांगितले. शाळेमधे जात असताना लहान विद्यार्थ्याना आनंद मिळावा आणि मजेशिर आवड़ निर्माण व्हावी अर्शी योजना आता यशस्वी होताना दिसत आहेConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.