ETV Bharat / state

कल्याणमध्ये बालमजुरांच्या जीवाशी खेळ, लग्नात झगमगाट राहण्यासाठी हातात दिली विजेची छत्री

लग्नाच्या वरातीत ३ ते ४ तास ही छत्री घेऊन मुलांना चालावे लागते. मात्र, गरजेपोटी मुले ही कामे करतात. त्यांच्या गरजेचा फायदा घेऊन मंगल कार्यालयेही त्यांच्याकडून कुठलीही कामे करवून घेताना दिसतात.

विशेष बातमी
author img

By

Published : Mar 12, 2019, 11:47 AM IST

कल्याण - लग्नाच्या मिरवणुकीत झगमगाट रहावा यासाठी विजेची छत्री बालमजुराच्या हातात देण्याचा प्रकार ठाण्यात समोर आला आहे. या मुलांच्या वयाच्या मानाने छत्रीचे वजन जास्त आहे. तसेच, विजेचा प्रवाह असल्याने ते धोकादायकही आहे. बालमजुरी करुन घेणे हा कायद्याने गुन्हा आहे. तरीही बालकांकडून मजूरी करुन घेण्याचे प्रकार सर्रास सुरू असल्याचे यानिमित्ताने दिसत आहे.

विशेष बातमी व्हीडिओ

लग्नाच्या वरातीत ३ ते ४ तास ही छत्री घेऊन मुलांना चालावे लागते. मात्र, गरजेपोटी मुले ही कामे करतात. त्यांच्या गरजेचा फायदा घेऊन मंगल कार्यालयेही त्यांच्याकडून कुठलीही कामे करवून घेताना दिसतात. या बदल्यात त्यांना दिवसाला १५० ते २०० रुपये असा अतिशय तुटपुंजी मजुरी दिली जाते. कल्याणमधील लालचौकी ते बैलबाजार मार्गावर हा प्रकार सर्रास दिसून येत आहे. या रस्त्यावर ८ ते १० मंगल कार्यालये आहेत. ती बिनधोकपणे बालकामगारांकडून काम करवून घेतात.

बालमजुरी कमी झाली आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात येते. दरवर्षी जाहिरातींवर कोट्यवधी रुपये खर्चून बालमजुराकडून काम करुन घेणे गुन्हा आहे असे सांगितले जाते. बालमजुरी कमी होत आहे असेही सांगितले जाते. बालमजुरीतून सुटका ही केवळ बालमजूरविरोधी दिनापुरतीच मर्यादित असल्याचे दिसत आहे.

दुसरीकडे लग्नाच्या वरातीमुळे बहुतांश शहरातील रस्त्यांवर वाहतूक कोंडी होत असल्याने त्यावर उपाय म्हणून डिसेंबर २०१३ मध्ये ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या परिसरातील तब्बल ५०० मंगल कार्यालयांना लग्न वरातीसाठी परवानगी घेण्यासाठी नोटीसा बजावल्या होत्या. सुरुवातीला काही मंगल कार्यालयांनी वाहतूक विभागाची परवानगी घेतल्याचे सांगण्यात आले. मात्र, लग्नात यजमानांची धावपळ होत असल्याने हळूहळू परवानग्या घेण्यासाठी अर्ज कमी झाले आहे.

लग्नाच्या वरातीत बालाकामारांकडून जीवघेण्या विजेशी खेळ  

ठाणे :- बालकामगारांना विविध जीवघेण्या व्यवसायात राबवून त्यांचे बालपण धोक्यात व हिंरवून घेतल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहे. अशीच एक घटना कल्याणात समोर आली आहे. १०० ते १५० रुपयांच्या मोबदल्यात रस्त्यावरून जाणाऱ्या वरातीत झगमगाट राहावा म्हणून मजुराच्या वजना एवढीच जीवघेण्या विजेची छत्री त्याच्या हातात देवून पिळवणूक केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे.

खळबळजनक बाब म्हणजे पोटाची खडगी भरण्यासाठी जीवघेण्या विजेची छत्री तीन ते चार तास हातात घेवून हे बालमजूर रस्त्यावर चालत असतात. त्याला कारणीभूतही घरात अठराविश्व दारिद्र्य, अज्ञात आणि दिवसागणिक गगनाला भिडणाऱ्या माहागाई असल्याने एका बालमजुराच्या बोलण्यातून समोर आले आहे. यामुळेच बालमजुरीचे भयाण वास्तव कल्याण शहरातील वर्दळीचा मार्ग असलेल्या लालचौकी ते बैलबजार मार्गावर दिसून येत आहे. या मार्गावर ८ ते १० छोटेमोठे मंगल कार्यलय आहेत. हि सर्व मंगल कार्यलय लग्नाच्या मुहूर्तवेळी गजबजलेली असतात. यातील बहुंताश मंगल कार्यलयात लग्नाच्या जेवणावळीत वाढपी म्हणून बालकामगारांना १५० ते २०० रुपये मजुरी देवून दहा - दहा तास राबवण्यात येत असल्याचे दिसून आले आहे. एकीकडे प्रशासनाच्या बालकामगार प्रतिबंधक विभागाकडून दरवर्षी कोट्यावधी रुपयांची जाहिरातबाजी करून बालमजुराकडून काम करू घेणे गुन्हा आहे. असे सांगण्यात येते. त्यातच बालमजुरांना जीवघेण्या व्यवसायातून सुटका होत असल्याचे प्रशासनाकडून जाहीर केलेल्या आकडेवारी वरून दिसून येते. मात्र त्या बालमजुरांची सुटका केवळ बालमजुरीविरोधी दिनापुरतीच मर्यादित असल्याचे लग्नाच्या वरातीत घडलेल्या प्रकारातून समोर आले आहे. त्यामुळे बालपण कोमेजून टाकणारी मजुरी आणि या मागची कारणे व वास्तव यावर जोपर्यत केंद्र व राज्य सरकार ठोस उपाययोजना अमंलात आणण्यासाठी कठोर पाउले उचलत नाही. तोपर्यंत बालमजुरीचे प्रमाण वाढत राहणार असल्याचे मत एका जाणकारांनी व्यक्त केले आहे.  

दुसरीकडे लग्नाच्या वारातीमुळे बहुंताश शहरातील रस्त्यावर वाहतूक कोंडी होत असल्याने त्यावर उपाय म्हणून डिसेंबर २०१३ मध्ये ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या परिसरातील तब्बल ५०० मंगल कार्यालयांना लग्न वरातीसाठी परवानगी घेण्यासाठी नोटीसा बजावल्या होत्या. सुरवातीला काही मंगल कार्यालयांनी वाहतूक विभागाची परवानगी घेतल्याचे सांगण्यात आले. मात्र लग्नात यजमानांची धावपळ होत असल्याने हळूहळू परवानग्या घेण्यासाठी अर्ज कमी झाले आहे. मात्र रात्रीच्या सुमाराला निघणाऱ्या लग्न वरातीत आजही बालमजुरांना बिनधास्तपणे राबविण्यात येत असल्याचे वास्तव समोर आले आहे.

(सर, व्हिडीओ मोजो वरून पाठवले आहे.)

.slug .. kalyan

Title ;- लग्नाच्या वरातीत बालाकामारांकडून जीवघेण्या विजेशी खेळ  

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.