ETV Bharat / state

अंबरनाथ एमआयडीसीमधील केमिकल कंपनीत वायू गळती; २८ कामगार बाधित - etv news live

अंबरनाथ शहरातील आनंदनगर भागात असलेल्या एमआयडीसीतील केमिकल कंपनीत वायू गळती झाल्याची घटना समोर आली आहे. या घातक वायू गळतीमुळे २८ कामगारांना बाधित झाले असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे.

केमिकल कंपनी वायू गळती
केमिकल कंपनी वायू गळती
author img

By

Published : Oct 12, 2021, 3:11 PM IST

Updated : Oct 12, 2021, 4:12 PM IST

ठाणे - अंबरनाथ शहरातील आनंदनगर भागात असलेल्या एमआयडीसीतील केमिकल कंपनीत वायू गळती झाल्याची घटना समोर आली आहे. या घातक वायू गळतीमुळे २८ कामगारांना बाधित झाले असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे. विशेष म्हणजे बाधितांमध्ये महिला कामगारांची संख्या जास्त आहे. तर आर. के. केमिकल कंपनी असे घातक वायू गळती झालेल्या कंपनीचे नाव आहे. याप्रकरणी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करून पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.

अंबरनाथ एमआयडीसीमधील केमिकल कंपनीत वायू गळती; एमआयडीसी अग्निशमन दल, शिवाजीनगर पोलीस आणि एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल

डिस्टिलेशनची प्रक्रिया सुरू असताना वायू गळती -

आर. के. केमिकल्स कंपनीमध्ये असून सल्फ्युरिक ॲसिडवर डिस्टिलेशनची प्रक्रिया करण्याचे सुरु होती. त्यातच कंपनीत आज सकाळच्या सुमारास डिस्टिलेशनची प्रक्रिया सुरू असताना अचानक प्लँटमधला एक पाईप निसटला आणि त्यातून हवेत गॅस पसरला. हा गॅस थेट बाजूलाच असलेल्या प्रेस फिट नावाच्या कंपनीत शिरल्याने अचानक धूर निर्माण होऊन वायू गळती झाली, आणि कामगारांना श्वास घ्यायला त्रास सुरु झाला. त्यामुळे कंपनीतील जवळपास २२ कामगारांना उलट्या, मळमळ, गुदमरणे असा त्रास सुरू झाला.

गॅस गळती कंपनीच्या निष्काळजीपणामुळे -

या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी अग्निशमन दल, शिवाजीनगर पोलीस आणि एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन वायू गळती नियंत्रणात आणली आहे. मात्र गॅस गळती कंपनीच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचा आरोप कंपन्यांची संघटना असलेल्या ऍडीशनल अंबरनाथ मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन म्हणजेच 'आमा' संघटनेचे अध्यक्ष उमेश तायडे यांनी केला आहे. तर या कंपनीवर योग्य ती कायदेशीर कारवाई सुरु केल्याची माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर भोगे यांनी दिली. मात्र याघटनेनंतर पुन्हा एकदा बदलापूर आणि अंबरनाथ एमआयडीसी भागागातील केमिकल कंपन्यामध्ये वारंवार वायू गळती होत असल्याचे समोर आल्याने नागरिकांचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

हेही वाचा - Vaccination : लवकरच लहान मुलांचे लसीकरण, 'या' वयाच्या मुलांना मिळणार लस

Last Updated : Oct 12, 2021, 4:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.