ETV Bharat / state

‘शब-ए-बारात’च्या पार्श्वभूमीवर 23 'कब्रस्थान' सील - thane news

मुस्लीम बांधवांचा शब-ए-बारातचा सण यंदा गुरुवारी (दि. 8 एप्रिल) रोजी होणार असून कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता भिवंडी पोलीस, महसूल, पालिका प्रशासन सज्ज झाले आहे. यासाठी भिवंडी शहरातील 23 कब्रस्थान सील करण्यात आली आहेत. तसेच घरीत राहून प्रार्थना करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

सील करण्यात आलेले कब्रस्थान
सील करण्यात आलेले कब्रस्थान
author img

By

Published : Apr 8, 2020, 8:29 PM IST

ठाणे - जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता 23 कब्रस्थान ‘शब-ए-बारात' सणानिमित्ताने 24 तासांसाठी पोलीस प्रशासनाकडून सील करण्यात आले आहेत. तसेच 'शब-ए-बारातसाठी' मुस्लीम धर्मियांनी घरा बाहेर पडू नये, एकत्र येऊन प्रार्थना करता कामा नये, तसेच शब-ए-बारातची नमाज मशिदीत देखील अदा करू नये, असे आवाहन मुस्लीम बांधवांना भिवंडी पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

पथसंचलन करताना पोलीस

मुस्लीम बांधवांचा शब-ए-बारातचा सण यंदा गुरुवारी (दि. एप्रिल) रोजी होणार असून कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता भिवंडी पोलीस, महसूल, पालिका प्रशासन सज्ज झाले आहे. यासाठी भिवंडी शहरातील 23 कब्रस्थान सील करण्यात आली आहेत. शब-ए-बारातच्या दिवशी मुस्लीम बांधव मोठ्या प्रमाणात मशिदीमध्ये नमाज पठण केल्यानंतर कब्रस्थानमध्ये जाऊन पूर्वजांसाठी प्रार्थना करतात. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडून सुरक्षेसंदर्भातील सर्व खबरदारी घेतली जात असून, नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस उपआयुक्त राजकुमार शिंदे यांनी केले आहे.

मुंब्रा कौसामधील खासगी रुग्णालय सील; कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण

तर सर्वच कब्रस्थान ट्रस्टींना भा. दं. वि. अधिनियम 149 प्रमाणे नोटीस बजावण्यात आली आहे. दरम्यान, शब-ए-बारातच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी भिवंडी शहरात संचालन केले असून खबरदारी म्हणून शहरात आज पासूनच 24 तास मोठ्या प्रमाणात नाक्या नाक्यावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर राज्य राखीव पोलीस दलाच्या जवानांचे पथक शहरातील 6 ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत.

हेही वाचा - मुंब्रा कौसामधील खासगी रुग्णालय सील; कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.