ठाणे: रील स्टार असलेले हे जोडपं जाहिरातीच्या गाण्यावर रील बनवत होते. पण हे रील बनवणे त्यांना महागात पडले आहे. पोलिसांनी या दोघांविरुद्धात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदर्श शुल्ला हा उल्हासनगर शहरातील श्रीराम चित्रपट गृहामागे असलेल्या आनंदनगरमध्ये कुटुंबासह राहतो. आदर्श आणि त्याची मैत्रिण विविध गाण्यांवर रील बनवत असतात, आणि ते रील इंस्टाग्रामवर व्हायरल करतात. त्यांच्या रीलला नेटकरी मोठ्या प्रमाणात लाईकही करतात. त्यामुळे हे दोघेही उल्हासनगरमधील 'रील स्टार' म्हणून ओळखले जातात.
'या' ठिकाणावर केले रिल शूट: सध्या उष्ण तापमानामुळे पारा ४० अंशावर गेल्याने 'चूबती जलती का मौसम आया' या गाण्यांवर 'रील' शूट करण्याचे जोडप्याने ठरवले. त्याप्रमाणे १७ मे रोजी दुपारच्या सुमारास भर उन्हात आदर्श आणि त्याची मैत्रीण दोघेही एका दुचाकीवरून शहरात फिरत होते. दरम्यान त्यांनी कल्याण अंबरनाथमार्गावरील सतरा सेक्शनहून फारवर्ड लाईनकडे धावत्या दुचाकीवरच 'चूबती जलती का मौसम आया' या गाण्यांवर 'रील शूट' केले.
पोलिसांकडून 'त्या' व्हिडिओची दखल: सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून डोक्यात हेल्मेट न परिधान करता, तसेच हलगर्जीपणे दुचाकी चालवत असतानाच त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. याच व्हायरल व्हिडिओची दखल घेऊन पोलीस हवालदार जगदीश छबीलाल महाजन यांच्या तक्रारीवरुन आदर्श आणि त्याच्या २२ वर्षीय मैत्रिणीवर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात भादंवि कलम २७९ सह मोटर वाहन कायदा कलम १२९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधर्म सावंत करीत आहेत.
स्टंटबाजी पडली महागात: मुंबईच्या रस्त्यावर स्टंटबाजी करणे तीन जणांना महागात पडले आहे. हायस्पीड बाईकवर धोकादायक स्टंट करणारा तरुण आणि दोन महिलांचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दोन महिलांसोबत स्टंटबाजी: एका व्यक्तीने दोन महिलांसोबत केलेल्या धोकादायक बाईक स्टंटचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी कारवाई केली. या तिघांनी बाईकवर 13 सेकंदाचा धोकादायक स्टंट केला. या स्टंटचा व्हिडिओ समोर आल्यानंतर मुंबई पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये एक पुरुष त्याच्यासमोर बसलेली एक महिला आणि दुसरी मागे बसलेली महिला दिसत आहे.
धोकादायक बाईक स्टंट : व्हिडिओमध्ये, स्टंटमॅन बाईकचे पुढचे चाक उचलून काही मीटरपर्यंत गाडी चालवताना दिसत आहे. दुचाकीमध्ये दोन महिलाही स्वार आहेत. एक महिला दुचाकीस्वाराच्या समोर बसलेली दिसत आहे. तिघांपैकी एकानेही हेल्मेट घातले नव्हते. मुंबई वाहतूक पोलिसांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, बीकेसी पोलीस स्टेशनमध्ये या तिघांविरुद्धात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींची ओळख पटवण्यासाठी तपास सुरू आहे. या व्हिडिओतील व्यक्तींबद्दल कोणाकडे काही माहिती असल्यास, तुम्ही आम्हाला थेट संपर्क करू शकता.
हेही वाचा:
- Law Minister of country: किरेन रिजीजू यांना कायदेमंत्री पदावरून हटविले; अर्जुन मेघवाल देशाचे नवे कायदा मंत्री
- Tulja Bhavani Temple News : अंगावर तोकडे कपडे घालणाऱ्या भाविकांना तुळजापूर मंदिरात दर्शनास मनाई
- SC verdict on Jallikattu bullock cart: हुर्रे.. बैलगाडी शर्यतीला सर्वोच्च न्यायालयाने दिली परवानगी, शर्यती घेण्याचा मार्ग मोकळा