मीरा भाईंदर(ठाणे) - युवक काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी करण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन न केल्यामुळे काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष प्रमोद सावंत यांच्यासह 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे कालच जिल्हाध्यक्ष या पदावर प्रमोद सामंत यांची नियुक्ती करण्यात आली. याबाबतचे पत्रक प्रदेश काँग्रेसकडून सायंकाळी प्रसिद्ध करण्यात आले. नवघर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाकडून २० लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करण्यात आले. मात्र, हे पैसे गेले कुठे? हा प्रश्न थेट केंद्र सरकारला विचारण्यासाठी शुक्रवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास युवक काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भाईंदर पूर्वेतील भाजप मध्यवर्ती कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले. मात्र, या आंदोलनात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी सामाजिक अंतरचे पालन न करता, चुकीच्या पद्धतीने हे आंदोलन केले, अशी तक्रार मीरा-भाईंदर भाजप प्रवक्ता रणवीर वाजपेयी यांनी नवघर पोलीस ठाण्यात केली. यानंतर जमावबंदी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष प्रमोद सामंत सह युवक अध्यक्ष दीप काकडे, सेवादल जिल्हा अध्यक्ष रविंद्र उपाध्याय, कुणाल काटकर यासह १५ कार्यकर्त्यांवर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली.
फिजिकल डिस्टन्सिंगचे उल्लंघन; जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीनंतर अवघ्या काही तासातच काँग्रेस पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल - काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रमोद सावंत
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाकडून २० लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करण्यात आले. मात्र, हे पैसे गेले कुठे? हा प्रश्न थेट केंद्र सरकारला विचारण्यासाठी शुक्रवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास युवक काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भाईंदर पूर्वेतील भाजप मध्यवर्ती कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले.