ठाणे - प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी भाजपाच्या निलंबीत प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्याविरोधात देशभर आक्रोश व्यक्त केला जात आहे. त्यातच भिवंडीत एका तरुणाने नुपूर शर्मांच्या सोशल मीडियावर पोस्ट टाकली होती. मात्र, या घटनेमुळे भिवंडी शहरात काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर त्या तरुणावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला ( case register against nupur sharma support post in bhiwandi ) आहे.
पोलिसांच्या बंदोबस्तामुळे शहरात शांतात - भिवंडी शहरातील वाजा मोहल्ला परिसरात राहणाऱ्या साद अन्सारी या तरुणाने नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकली. ही माहिती मिळताच शहरात शेकडो मुस्लीम समाजाचे नागरिक रस्त्यावर उतरले तसेच, तरुणाच्या घरी धाव घेतली. मात्र, परिस्थिती लक्षात घेता तरुण राहत असलेल्या परिसरात व शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.
आक्षेपार्ह पोस्ट टाकणारा तरुण पोलिसांच्या ताब्यात - आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या साद अन्सारी विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेतले असून, त्याच्याविरोधात भिवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा - Pankaja Munde : उमेदवारी नाकारल्याने पंकजा मुंडे समर्थक आक्रमक; केंद्रीय मंत्री कराडांच्या कार्यालयावर हल्ला