ETV Bharat / state

Fake Doctors: गरोदर मातांचा मृत्यू; तीन बोगस महिला डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल - Case Filed Against The 3 Fake Doctors

भिवंडीतील कामगार वस्तीच्या शहरात असंख्य झोपडपट्टी विभागांमधून बोगस डॉक्टर सर्रासपणे सर्वसामान्य नागरिकांवर औषध उपचार करून त्यांच्या जीवाशी खेळ करीत आहेत. याबाबत अनेक तक्रारी महापालिका आरोग्य विभागाकडे आल्या आहेत. अशाच दोन गरोदर मातांचा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मुत्यू झाल्याच्या तक्रारीनंतर भिवंडी शहरात वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या आणखी तीन बोगस महिला डॉक्टरवर महानगरपालिका वैद्यकीय अधिकारी यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करत तिन्ही बोगस डॉक्टरांवर शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

Fake Doctors
तीन बोगस महिला डॉक्टर
author img

By

Published : Apr 28, 2023, 8:03 PM IST

ठाणे: भिवंडीतील कामगार वस्तीच्या शहरात असंख्य झोपडपट्टी विभागांमधून बोगस डॉक्टर सर्रासपणे सर्वसामान्य नागरिकांवर औषध उपचार करून त्यांच्या जीवाशी खेळ करीत आहेत. याबाबत अनेक तक्रारी महापालिका आरोग्य विभागाकडे आल्या आहेत. अशाच दोन गरोदर मातांचा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मुत्यू झाल्याच्या तक्रारीनंतर भिवंडी शहरात वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या आणखी तीन बोगस महिला डॉक्टरवर महानगरपालिका वैद्यकीय अधिकारी यांच्या तक्रारीवरून तिन्ही बोगस डॉक्टरांवर शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

दवाखान्यातील साहित्य जप्त: रिजवाना शफिक अन्सारी (वय ४५) , नुरजॉह इसुब खान (वय ५०) आणि नुसरत सुफियान खान अशी अटक केलेल्या बोगस महिला डॉक्टरांची नावे आहेत. शांतीनगर भागात बोगस डाॅक्टर व्यवसाय थाटून नागरिकांवर उपचार करत असल्याची माहिती भिवंडी महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. जयवंत धुळे यांना मिळाली होती. त्यानंतर भिवंडी महापालिकेचे वैद्यकीय पथक आणि शांतीनगर पोलिसांनी येथील शांतीनगर मधील अमन मंजिल, गायत्रीनगर या भागात गुरुवारी पाहणी केली असता, ह्या तिघी बोगस महिला डाॅक्टर गरोदर मातावर उपचार करताना आढळून आले. त्यांची पंचांसमक्ष चौकशी केली असता त्यांच्याकडे वैद्यकीय प्रमाणपत्र आढळून आले नाही. याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडील विविध प्रकारची औषधे, इंजेक्शन व दवाखान्यातील साहित्य जप्त करण्यात आली आहे.

बोगस डॉक्टरांमुळे रुग्णांचे आरोग्य धोक्यात: भिवंडीत बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट वाढला आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. भिवंडी तालुक्यात मोठ्या प्रमाणात बनावट वैद्य अवैधपणे दवाखान्यांचा थाट मांडून बसले आहेत. भिवंडीत सन २०१५ पासून १७ फेब्रुवारी २०२३ पर्यंत अवैधरित्या दवाखाने चालवणाऱ्या २५ हुन अधिक बोगस वैद्यांवर महापालिका प्रशासनाने धाड टाकून कारवाई केली. तर शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

बोगस मुन्नाभाईंवर अटकेची कारवाई : बोगस डॉक्टरांना अटक केल्यानंतरही असे मुन्नाभाईंची दुकाने शहरांत सर्रासपणे सुरू आहेत. सर्वेक्षणानुसार शहरातील गल्लीबोळात तसेच सर्जन ठिकाणीही अवैधपणे रुग्णालये चालवली जात आहेत. दरम्यान मनपा प्रशासनाने शैक्षणिक अर्हता नसणारे बहुतांश बोगस डॉक्टर अवैधपणे व्यवसाय करीत आहे. २०१५ पासून आतापर्यत अवैधरित्या दवाखाने चालवणाऱ्या २५ हुन अधिक बोगस वैद्यांवर महापालिका प्रशासनाने धाड टाकून कारवाई केली आहे.

हेही वाचा: आयुर्वेदिक डॉक्टरांना अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांच्याप्रमाणे समान वेतन मिळणार नाही सर्वोच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.