ETV Bharat / state

राज ठाकरे यांच्या विरोधात फेसबुकवर आक्षेपार्ह विधान; कल्याणमध्ये तक्रार दाखल - bjp

राज ठाकरे यांच्या बद्दल अश्लील आणि अपमानजनक कमेंट्स केल्या होत्या. त्यामध्ये हिम्मत असेल तर आपल्या विरोधात तक्रार करा, असे आव्हानही मनसैनिकांसह राज ठाकरेंना दिले होते.

राज ठाकरे
author img

By

Published : May 3, 2019, 12:32 PM IST

ठाणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सभा घेत एकच हल्लाबोल केला. याचे पडसाद सोशल मीडियावर उमटले असून मनसे व भाजप समर्थकांमध्ये सोशल मीडियावर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत. अशाच एका घटनेत राज ठाकरे यांच्या विरोधात फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी दोघा व्यक्ती विरोधात कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. अजय पाटील आणि विकास होले असे राज ठाकरे विरोधात फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्याची नावे आहेत.

मनसेचे कल्याण उपशहर अध्यक्ष असलेल्या योगेश गव्हाने यांच्या महाराष्ट्र देशा या फेसबुक पेजवर राज ठाकरे यांच्या विरोधात कल्याण पूर्वेत राहणाऱ्या विकास होले याने अपमानजनक पोस्ट टाकली होती. त्यावर अजय पाटील याने ही पोस्ट लाईक करून राज ठाकरे यांच्या बद्दल अश्लील आणि अपमानजनक कमेंट्स केल्या होत्या. त्यामध्ये हिम्मत असेल तर आपल्या विरोधात तक्रार करा, असे आव्हानही मनसैनिकांसह राज ठाकरेंना दिले होते.

या पोस्टची माहिती मिळताच मनसेचे कल्याण उपशहर अध्यक्ष योगेश गव्हाने यांनी या प्रकरणी कोळसेवाडी पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम ५०० अंतर्गत गुन्हा दाखल करत अधिक तपास सुरू केला आहे. मात्र या राज ठाकरे यांच्या विरोधातील अपमानजनक पोस्टमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असून पोलीस या याप्रकरणी कोणती कारवाई करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

राज ठाकरे विरोधात फेसबुकवर आक्षेपार्ह विधान; पोलिसात तक्रार दाखल  

ठाणे :- पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनि सभा घेत एकच हल्लाबोल केला. याचे पडसाद सोशल मीडियावर उमटले असून मनसे व भाजप समर्थकाध्ये सोशल मीडियावर आरोप प्रत्यारोप करत आहेत. अश्याच एका घटनेत राज ठाकरे विरोधात फेसबुकवर आक्षेपार्ह विधान करणाऱ्या व्यक्ती विरोधात  कोळसेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. अजय पाटील आणि  विकास होले असे राज ठाकरे विरोधात फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्याची नावे आहेत.

मनसेचे कल्याण उपशहर अध्यक्ष असलेल्या योगेश गव्हाने यांच्या महाराष्ट्र देशा या फेसबुक पेजवर राज ठाकरे यांच्या विरोधात कल्याण पूर्वेत राहणाऱ्या विकास होले याने अपमानजनक पोस्ट टाकली असून अजय पाटील याने ही पोस्ट लाईक करत राज ठाकरे यांच्या बद्दल अश्लील आणि अपमानजनक कमेंट्स या पोस्टवर करत हिम्मत  असेल तर आपल्या विरोधात तक्रार करा अशा धमक्या मनसे कार्यकर्त्यांना आणि राज ठाकरे यांना दिल्या आहेत.

ही पोस्ट नजरेस पडल्यानंतर या प्रकरणी मनसेचे कल्याण उपशहर अध्यक्ष योगेश गव्हाने  यांनी कोळसेवाडी पोलिसात तक्रार केली असून पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम 500 अंतर्गत गुन्हा दाखल करत अधिक तपास सुरू केला आहे. मात्र या राज ठाकरे यांच्या विरोधातील अपमानजनक पोस्टमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असून पोलिया याप्रकरणी कोणती कारवाई करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.