ETV Bharat / state

नविन इंजिन लावून पंचवटी एक्स्प्रेस मुंबईकडे रवाना, कपलिंग तुटल्याने रखडली होती रेल्वे

मनमाड-मुंबई पंचवटी एक्स्प्रेसचे कपलिंग तुटल्यामुळे गाडीचे काही डब्बे मागे ठेवून धावल्याची घटना समोर आली आहे.

नविन इंजिन लावून पंचवटी एक्स्प्रेस मुंबईकडे रवाना
author img

By

Published : Mar 7, 2019, 1:20 PM IST

Updated : Mar 7, 2019, 1:59 PM IST

ठाणे - नाशिकवरून मुंबईला जाणाऱया पंचवटी एक्स्प्रेसचे तीन डबे कल्याणजवळील पत्रीपूल दरम्यान वेगळे झाले होते व बाकीचे डबे सीएसटीच्या दिशेने रवाना झाले होते. कपलिंग तुटल्याने हा प्रकार घडला होता. अखेर नवीन इंजिन लावून रेल्वे मुंबईकडे रवाना झाली आहे. घटनेमुळे मध्य रेल्वेची वाहतूकीवर परिणाम झाला आहे.

नविन इंजिन लावून पंचवटी एक्स्प्रेस मुंबईकडे रवाना

मनमाड-मुंबई पंचवटी एक्स्प्रेसचे कपलिंग तुटल्यामुळे गाडीचे काही डब्बे मागे ठेवून धावल्याची घटना समोर आली आहे. कल्याणच्या पत्रीपूल परिसराजवळ ही घटना घडली आहे. या गाडीचे इंजिनपासूनचे दोन डबे पुढे धावले आणि अन्य डबे मागेच राहिले. त्यानंतर नवीन इंजिन जोडून एक्स्प्रेस मुंबईकडे रवाना झाली आहे.

दरम्यान, मध्य रेल्वेवर जलद मार्गावरील वाहतुकीवर याचा परिणाम झाला आहे. कपलिंग तुटण्याची ही दुसरी घटना असून या पुर्वीही दिवा रेल्वे स्थानकादरम्यान असाच प्रकार घडला होता.

Intro:Body:

[3/7, 10:37 AM] Siddharth Kamble, Thane: ब्रेकिंग :कल्याण पत्री पूल दरम्यान पंचवटी एक्स्प्रेस चे तीन  डब्बे पत्रीपूल दरम्यान वेगळे झाले असून  बाकी डब्बे सीएसटीच्या दिशेने रवाना कपलिंग तुटल्याने हा प्रकार घडल्याचे सांगितले जात, सध्या रेल्वे प्रशासनाने दुरुस्ती काम युद्ध पातळीवर सुरु, घटनेमुळे मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प

[3/7, 10:49 AM] Siddharth Kamble, Thane: ऐन गर्दीच्या वेळी सकाळ च्या सुमारास मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. मनमाड- मुंबई पंचवटी एक्स्प्रेसचे कपलिंग तुटल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली असून  मनमाड- मुंबई पंचवटी एक्स्प्रेस ही काही डबे मागे ठेवून धावल्याची घटना समोर आली आहे. कल्याणच्या पत्रीपूल परिसराजवळ ही  घटना घडली आहे   पंटवटी एक्स्प्रेस या गाडीचे इंजिनपासून दोन डबे पुढे धावले आणि अन्य डबे मागेच थांबले आहेत, घटनास्थळी रेल्वे प्रशासनाकडून युद्ध पातळीवर दुरुस्ती चे काम सुरू असून लवकरच दुरुस्ती करून एक्स्प्रेस रवाना करणार असल्याचे रेल्वे जनसंपर्क अधिकारी यांनी सांगितलं,

दरम्यान, मध्य रेल्वेवर जलद मार्गावरील वाहतुकीचा खोळंबा झाला असून आठवड्याच्या सुरुवातीलाच प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत. कपलिंग तुटण्याची दुसऱ्यांदा घटना  घडली आहे, या पुर्वीही दिवा रेल्वे स्थानक दरम्यान असाच प्रकार घडला होता

Conclusion:
Last Updated : Mar 7, 2019, 1:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.