ETV Bharat / state

ठाण्यात सापडलेल्या तोफांना मिळणार नवसंजीवनी - पुरातत्व विभाग ठाणे

निसर्गाचे वरदान मिळालेल्या ठाणे शहराला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. अनेक ऐतिहासिक गोष्टींच्या खाणाखुणा आजही येथे आढळून येतात. शहरातील भूईकोट किल्लाच्या (सेंट्रल जेल) सुरक्षेसाठी पोर्तुगिजांनी बनवलेल्या तोफा काही दिवसांपूर्वी उत्खननात सापडल्या आहेत. या ऐतिहासिक तोफांचे संवर्धनाचे काम सुरू असून पर्यटकांना पाहण्यासाठी त्या ठेवण्यात येणार आहेत.

सापडलेल्या तोफा
सापडलेल्या तोफा
author img

By

Published : Feb 8, 2020, 8:44 PM IST

ठाणे - शहरातील भूईकोट किल्लाच्या (सेंट्रल जेल) सुरक्षेसाठी पोर्तुगिजांनी बनवलेल्या तोफा काही दिवसांपूर्वी उत्खननात सापडल्या आहेत. या ऐतिहासिक तोफांचे संवर्धनाचे काम सुरू असून पर्यटकांना पाहण्यासाठी त्या ठेवण्यात येणार आहेत. पुरातत्व विभाग, ठाणे महानगरपालिका, मेरिटाईम बोर्ड आणि दुर्गवीर प्रतिष्ठानने या कामासाठी पुढाकार घेतला आहे.

ठाण्यात सापडलेल्या तोफांना मिळणार नवसंजीवनी

निसर्गाचे वरदान मिळालेल्या ठाणे शहराला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. अनेक ऐतिहासिक गोष्टींच्या खाणाखुणा आजही येथे आढळून येतात. ठाण्यातील मध्यवर्ती कारागृह हा सुद्धा याच इतिहासाचा एक भाग आहे. येथील भूईकोट किल्ल्याच्या संरक्षणासाठी पोर्तुगिजांनी सुमारे ४० तोफा तैनात ठेवल्या होत्या, असे जाणकार सांगतात.

हेही वाचा - 'इंद्रायणी स्वच्छ करण्याची जबाबदारी माझी'

सोळाव्या शतकात पोर्तुगीज आणि अरेबियन लोक या बंदराचा व्यापारासाठी वापर करत होते. व्यापारी जहाजे बांधण्यासाठी यातील काही तोफांचा वापर केला जात असे. ४० तोफांपैकी सध्या ११ तोफा शिल्लक आहेत. काळाच्या ओघात, पुरातत्व खाते आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दुर्लक्षामुळे या तोफांची स्थिती वाईट होऊ लागली आहे.

शिल्लक राहिलेल्या तोफा अर्ध्या जमिनीत गाडलेल्या स्थितीत असल्याने त्यांची माती होऊ लागली आहे. त्यामुळे आता विविध संस्थांनी एकत्र येऊन तोफांच्या संवर्धनासाठी पुढाकार घेतला आहे. यामध्ये दुर्गवीर प्रतिष्ठाण मुंबई, दुर्गसखा चॅरिटेबल ट्रस्ट ठाणे, राजे प्रतिष्ठान चिपळूण आणि चेंदानी कोळीवाडा जमात ट्रस्ट यांचाही समावेश आहे. पुरातत्व विभागाच्या परवानगीने या तोफा जमिनीबाहेर काढून मोकळ्या जागेत ठेवल्या जाणार आहेत. सुरुवातीला सहा तोफा काढल्या असून विसर्जन घाट येथे महापालिकेने बांधलेल्या चौथऱ्यावर त्या सुशोभित करण्यात येणार आहेत. त्यानंतर इतर तोफा काढण्याचे काम देखील सुरू झाले आहे.

Intro:ठाण्यात सापड़लेल्या तोफाना मिळणार नवसंजीवनीBody:ठाणे शहरातील भूईकोट किल्लाच्या (आत्ताचे सेंट्रल जेल) सुरक्षेसाठी पोर्तुगिज बनावटीच्या तोफा काढून   ऐतिहासिक तोफांचे लवकरच संवर्धन होणार असून पर्यटकांना पाहण्यासाठी त्या दर्शनी भागावर ठेवण्यात येणार आहेत. पुरातत्व विभाग, ठाणे महानगर पालिका, मेरिटाईम बोर्ड आणि दुर्गवीर प्रतिष्ठानने या कामासाठी पुढाकार घेतला आहे. खाडी किनारी मातीमध्ये उलट्या गाडण्यात आलेल्या तोफा आता लवकरच जमिनीवर मांडण्यात येणार असल्याने मोकळा श्वास घेणार आहेत. महाराष्ट्र शासनाच्या गड संवर्धन समितीच्या कायकर्ते  परिश्रम काढून या तोफा काढणार असून सुरुवातीला 13 तोफा पैकी .6 तोफा काढून त्या सुशोभित करण्यात येणार आहे.निसर्गाचे वरदान मिळालेल्या ठाणे शहराला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. अनेक ऐतिहासिक गोष्टींच्या खाणाखुणा आजही येथे आढळून येतात. ठाण्यातील माध्यर्ती कारागृह हा सुद्धा इतिहासाचाच एक भाग आहे. पुर्वीचा भूईकोट किल्ला म्हणून प्रसिद्ध असलेल्या या किल्ल्याच्या संरक्षणासाठी सुमारे ४० तोफा तैनात ठेवण्यात आल्या होत्या, असे जाणकार सांगतात. मात्र काळाच्या ओघात आणि पुरातत्व खाते व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दुर्लक्षामुळे सध्य स्थितीत या तोफांची माती होऊ लागली आहे. सध्या येथे अवघ्या ११ तोफा मातीमध्ये उलट्या गाडलेल्या आहेत. १६ व्या शतकात पोर्तुगिज आणि अरेबियन लोक या बंदराचा व्यापारासाठी वापर करीत होते. व्यापारी जहाजे बांधण्यासाठी काही तोफांचा वापर केला जात असे. त्यातील सध्य स्थितीत ११ तोफा शिल्लक राहिल्याचे दिसते. शिल्लक राहिलेल्या तोफा अर्ध्या जमिनीत गाडल्यामुळे त्याची माती होऊ लागली आहे. त्यामुळे गड संवर्धन समितीने पुढाकार घेऊन या तोफांचे जतन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी दुर्गवीर प्रतिष्ठाण मुंबई  ,दुर्गसखा चॅरिटेबल ट्रस्ट ठाणे ,राजे प्रतिष्ठान चिपळूण ,आणि चेंदानी कोळीवाडा जमात ट्रस्ट या समितीने पुढाकार घेऊन या तोफांची निगा राखण्यासाठी पुढाकार घेतला आहे. पुरातत्व विभागाच्या परवानगीने या तोफा जमिनीबाहेर काढून मोकळ्या जागेत ठेवल्या जाणार आहेत. त्यासाठी ठाणे महानगर पालिका, मेरीटाइम बोर्ड यांचेही  आर्थिक दृष्टया सहकार्यलाभावे असे त्यांचे म्हणने आहे . सुरुवातीला सहा तोफा काढल्या  असून विसर्जन घाट इथे महापालिकेने बांधलेल्या चौथऱ्यावर त्या सुशोबीत करण्यात येणार आहेत . त्यानंतर इतर तोफा काढण्याचे काम देखील सुरु झाले आहे .  

BYTE :- सचिन जोशी ( पुरातन अभ्यासक )Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.