ETV Bharat / state

ठाण्यात दहा बसेस ॲम्ब्युलन्समध्ये रूपांतरित, प्रत्येक बसमध्ये ब्रदरसह अटेंडंटची नियुक्ती

कोरोनाविरूद्धचा लढा अधिक तीव्र करताना त्यासाठी लागणाऱ्या सुविधांची वानवा भासू नये, या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त सिंघल यांनी हा निर्णय घेतला असून ठाणे परिवहनच्या दहा बसेस आता ॲम्ब्युलन्स म्हणून वापरण्यात येणार आहेत.

thane
ठाण्यात दहा बसेस ॲम्ब्युलन्समध्ये रूपांतरित, प्रत्येक बसेमध्ये ब्रदर आणि अटेंडंटची नियुक्ती
author img

By

Published : May 18, 2020, 12:04 PM IST

Updated : May 18, 2020, 1:11 PM IST

ठाणे - महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. हीच बाब लक्षात घेवून महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी चक्क टीएमटीच्या बसेस ॲम्ब्युलन्समध्ये रूपांतरित करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे. सोमवारी संध्याकाळपर्यंत पाच बस ॲम्ब्युलन्स कोरोना विरूद्धच्या लढाईत सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे या सर्व बसेसमध्ये तीन पाळ्यामध्ये ब्रदर्स आणि अटेंडंटची नियुक्ती करण्यात आली आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या सुचनेच्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला आहे.

ठाण्यात दहा बसेस ॲम्ब्युलन्समध्ये रूपांतरित, प्रत्येक बसमध्ये ब्रदरसह अटेंडंटची नियुक्ती

कोरोनाविरूद्धचा लढा अधिक तीव्र करताना त्यासाठी लागणाऱ्या सुविधांची वानवा भासू नये, या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त सिंघल यांनी हा निर्णय घेतला असून ठाणे परिवहनच्या दहा बसेस आता ॲम्ब्युलन्स म्हणून वापरण्यात येणार आहेत. एका बसमध्ये दोन बेड बसविण्यात आले असून ड्रायव्हरच्या केबिनपासून ॲम्ब्युलन्सचा भाग पार्टीशनच्या साहाय्याने पूर्णतः स्वतंत्र ठेवण्यात आला आहे. सदरच्या बस ॲम्ब्युलन्स तीन पाळ्यांमध्ये चालविण्यात येणार असून या प्रत्येक बसमध्ये प्रत्येक पाळीमध्ये एक ब्रदर आणि एक अटेंडंट नियुक्त करण्यात आले आहेत.

यातील पहिल्या पाच बस ॲम्ब्युलन्स आज सोमवार सायंकाळपासून सेवेत रूजू होणार आहेत. तर उर्वरित 5 बसेस मंगळवार सायंकाळपर्यंत पूर्ण क्षमतेने चालणार आहेत.

Last Updated : May 18, 2020, 1:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.