ETV Bharat / state

बहीण-भावाच्या नात्याला काळिमा; अल्पवयीन बहिणीवर भावाकडून अत्याचार - thane

चुलत भावाने १२ वर्षीय अल्पवयीन बहिणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना भिवंडीत उघडकीस आली आहे.

बहीण-भावाच्या नात्याला काळिमा
author img

By

Published : Mar 3, 2019, 10:11 PM IST

ठाणे - एका २० वर्षीय चुलत भावाने १२ वर्षीय अल्पवयीन बहिणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना भिवंडीत उघडकीस आली आहे. हेमंत असे आरोपीचे नाव आहे.

भिवंडी शहर परिसरात गंभीर गुन्ह्यांची मालिका सुरू असून बलात्काराचे गुन्हे दिवसाआड घडत आहेत. या परिसरात पीडित अल्पवयीन मुलगी कुटुंबासह राहते. तिच्या शेजारी तिचा चुलत भाऊ हेमंत राहतो. त्याने पीडितेला इस्त्रीचे कपडे आणण्याचा बहाणा करून घरात बोलावले. पीडिता घरातच येताच नराधमाने दरवाजाची कडी लावली आणि तिच्या तोंडावर रुमाल बांधून जबरदस्तीने अत्याचार केले.

शारीरिक वेदना असह्य झाल्याने याबाबत पीडीतेने आपल्या आईला सांगितले. तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. पीडितेच्या आईने नारपोली पोलीस ठाण्यात धाव घेऊन बलात्कारासह पोक्सा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. तेव्हा पोलिसांनी आरोपीला अटक केली. शनिवारी आरोपीला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने आरोपीला ८ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Intro:Body:

बहीण-भावाच्या नात्याला काळिमा; अल्पवयीन बहिणीवर भावाकडून अत्याचार

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.