ठाणे - वडिलोपार्जित असलेल्या घराच्या हिस्सेवाटीवरून दोघा भावांमध्ये वाद झाला. या वादातून लहान भावाने मोठ्या भावाच्या अंगठ्याला कडाळून चावा घेतल्याने हाताच्या अंगठ्याचा समोरील भाग तुटून पडला आहे. याप्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात हल्लेखोर भावाविरोधात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. श्रीधर जमण्णा पिटला, असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. तर, शंकर जमण्णा पिटला ( वय,४४ ) असे जखमीचे नाव ( brother broke another thumb in ambarnath ) आहे.
शंकर हा रिक्षाचालक असून, तो अंबरनाथ पश्चिम भागातील न्यू बालाजी नगर परिसरात कुटुंबासह रहातो. तर, आरोपी श्रीधर हा अंबरनाथ मध्येच वेगळा राहतो. गेल्या काही दिवसापासून शंकर राहत असलेल्या घरावरून दोघा भावात वाद सुरु होता. याच वादातून आरोपी श्रीधर हा २० जुलै रोजी सांयकाळच्या सुमारास शंकरच्या घरी येऊन 'हे घर माझ्या बापाचे असून, मला त्या मधला हिस्सा पाहिजे' असा वाद घातला.
यावेळी श्रीधरने शंकरला शिविगाळ करून ठोश्याबुक्याने बेदम मारहाण केली. याला प्रतिकार करताच श्रीधरने शंकरचा उजवा हात पकडून त्याच्या हाताच्या अंगठ्याला कडाळून चावा घेतला. त्यामुळे हाताच्या अंगठ्याचा समोरील भाग तुटून पडला. या घटनेत शंकरच्या अंगठ्याला गंभीर दुखापत झाली. याप्रकरणी शंकरच्या तक्रारीवरून आरोपी श्रीधरवर २१ जुलै रोजी विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक डी. टी. भंडे करीत आहेत.
हेही वाचा - Krupal Tumane : 'खासदारांना विनायक राऊतांचा प्रचंड त्रास, लोकसभेत बाजू मांडू देत नसत'; कृपाल तुमानेंचा आरोप