ETV Bharat / state

'तू मर जा' असे प्रेयसीने म्हणताच, प्रियकराची फेसबुक लाइव्ह करत आत्महत्या - फेसबुक लाईव्ह करत प्रियकराची आत्महत्या

एका २७ वर्षीय प्रियकराला त्याच्या प्रेयसीने ‘मला तुझी गरज नाही, ‘तू मर जा’ असे बोलताच त्या तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे आत्महत्येपूर्वी त्याने फेसबुक लाईव्ह करून कल्याण पश्चिम परिसरातील राहत्या घरात जीवन यात्रा संपवली आहे.

Boyfriend commits suicide
Boyfriend commits suicide
author img

By

Published : Aug 7, 2021, 1:06 AM IST

ठाणे - एका २७ वर्षीय प्रियकराला त्याच्या प्रेयसीने ‘मला तुझी गरज नाही, ‘तू मर जा’ असे बोलताच त्या तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे आत्महत्येपूर्वी त्याने फेसबुक लाईव्ह करून कल्याण पश्चिम परिसरातील राहत्या घरात जीवन यात्रा संपवली आहे. या तरुणाने आपण प्रेम प्रकरणातून आत्महत्या करत असल्याचे फेसबुक लाईव्हमध्ये म्हटले आहे. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करून पोलिसांनी तपास सुरु केला आहे. अंकुश नामदेव पवार (वय, २७) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

घटस्फोटीत तरुणीशी प्रेमसंबध..

मृत अंकुश मुळचा जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई गावात कुटूंबासह राहत होता. त्यातच घरची परिस्थिती हलाखीची असल्याने मृत अंकुश चार वर्षांपूर्वी कामाच्या शोधात कल्याणात येऊन एका खासगी रुग्णालयात वार्डबॉय म्हणून नोकरीला लागला होता. याच सुमारास त्याची एका घटस्फोट झालेल्या तरुणीशी ओळख झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. विशेष म्हणजे गेल्या तीन वर्षांपासून अंकुशचे त्या तरुणीशी प्रेमसंबंध सुरू होते. दोघांनी लग्न करण्याचेही ठरवले होते.

तरुणीच्या छळामुळेच आत्महत्या केल्याचा नातेवाईकांचा आरोप -

मृत अंकुश लग्न करण्यासाठी आपल्या पगारातील काही पैसे प्रेयसीकडे जमा करून ठेवत होता. मात्र जमा केलेले पैसे प्रेयसी पार्टी आणि मौज करण्यासाठी उडवत असल्याची माहिती अंकुशला मिळाली. यामुळे त्याने प्रेयसीला याबाबत विचारणा केल्याने यातून दोघांमध्ये वारंवार खटके उडत होती. तरुणी अंकुशशी उद्धटपणे वागत होती. यामुळे प्रेयसीचे वागणे त्याच्या जिव्हारी लागले. त्याने माझ्या जीवाचे बरे वाईट करतो म्हणून धमकी दिली. यावर प्रेयसीने देखील 'तू मरून जा, मला तुझी गरज नाही' असे सुनावले. यामुळे दोघांमध्ये पुन्हा वाद झाल्यानंतर गुरुवारी सकाळी साडे सातच्या सुमारास अंकुशने काही मिनिटांचे फेसबुक लाइव्ह करत आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्यानं प्रेमात धोका मिळाल्याने आत्महत्या करत असल्याचे सांगितले आहे. तर प्रेयसीने छळ केल्यामुळेच आपल्या मुलाने आत्महत्या केल्याचा आरोपी मृताच्या नातेवाईकांकडून करण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.