ETV Bharat / state

Waldhuni River : पुरात वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह दोन दिवसानंतर वालधुनी नदीत सापडला - नद्या ओढ्याना पूर

ठाणे जिल्ह्यात मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. यामुळे जिल्ह्यातील अनेक नद्या ओढ्यांना पूर आला आहे. याच दरम्यान अंबरनाथच्या जुना भेंडी पाडा परिसरात, पुरामुळे नाल्यात वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह अखेर दोन दिवसानंतर वालधुनी नदीत सापडला आहे.

Thane News
पुरात वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह
author img

By

Published : Jul 22, 2023, 3:51 PM IST

Updated : Jul 23, 2023, 12:47 PM IST

पोलीस अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया

ठाणे : जिल्ह्यात गेल्या चार दिवसापासून मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. सर्वाधिक पावसाची नोंद असलेल्या अंबरनाथ तालुक्यात जोरदार पाऊस कोसळल्याने, बुधवारी अंबरनाथ शहरातील अनेक भागात आलेल्या पुरामुळे, नाल्यात वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह अखेर उल्हासनगर हद्दीतील वालधुनी नदीत सापडला आहे. राहील शेख, वय २८, रा. अंबरनाथ असे नदी पात्रात सापडलेल्या मृत तरुणाचे नाव आहे.

पुरात वाहून गेला तरूण : जिल्ह्यात गेल्या चार दिवसापासून मुसळधार पावसामुळे सर्वच नद्यांना पूर आला आहे. शिवाय अनेक शहरातील नाले, ओढे तुडंब भरून वाहत आहेत. बुधवारी तर बदलापूर, अंबरनाथ आणि उल्हासनगर शहरातील मुसळधार पावसामुळे अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण झाली होती. याच दरम्यान अंबरनाथच्या जुना भेंडीपाडा परिसरात राहणारा २८ वर्षीय राहील शेख या तरुणाने पोहण्यासाठी नाल्यात उडी मारली होती. मात्र पुरामुळे नाल्याच्या पाण्याला वेगवान प्रवाह असल्याने तो वाहत वालधुनी नदी पत्रात गेला होता.

वालधुनी नदीत आढळला मृतदेह : प्रशासनाने दोन दिवस त्याचा शोध घेतला, अखेर दोन दिवसानंतर राहीलचा मृतदेह वालधुनी नदीत आढळून आला. यासंदर्भाची माहिती स्थानिकांनी उल्हासनगर शहरातील मध्यवर्ती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी मध्यवर्ती शासकीय रुग्णालयात रवाना केला. तर दुसरीकडे राहीलचा मृतदेह सापडल्याने त्याच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

अनेक वाहने पाण्यात अडकून पडली : याआधीही मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच शहरातील सखल भागात पाणी साचले होते. तसेच शेकडो नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे हाल झाले होते. या मुसळधार पावसाचा सर्वाधिक परिणाम रेल्वेसह जिल्ह्यातील प्रमुख मार्गवरील वाहतुकीवर झाला होता. जिल्ह्यात सर्वत्र पावसाचा कहर पाहता भिवंडी, कल्याण, डोंबिवली, मुंब्रा, अंबरनाथ, टिटवाळा, उल्हासनगर, बदलापूर शहरी भागासह ग्रामीण भागातील बहुतांश सखल भाग जलमय झाला होता.

हेही वाचा -

  1. Thane Flood : रुळावरून चालताना चार महिन्यांचे बाळ पडले पुराच्या पाण्यात, अद्यापही बाळ बेपत्ताच
  2. body of laborer who swept away by flood was found पुरात वाहून गेलेल्या कामगाराचा मृतदेह सापडला; पाच वर्षीय मुलीचा शोध सुरूच
  3. young man rescued from River Flood : दुधना नदीच्या पुरात वाहून जाणारा तरुण कठडा हाती आल्याने बचावला

Last Updated : Jul 23, 2023, 12:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.