ठाणे - दोघा मैत्रिणींचे मुरबाड तालुक्यातील पोटगावच्या जंगलात गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शारदा अविनाश अंबिज (१८) आणि मनिषा निरगुडे (१९) असे मृत अवस्थेत आढळून आलेल्या दोघीचे नावे असून त्या कल्याण तालुक्यातील केळणी आदिवासीवाडीच्या रहिवाशांच्या होत्या. याप्रकरणी मुरबाड पोलीस ठाण्यात आकस्मीत मृत्यूची नोंद करून पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
आदिवासी तरुणांमुळे प्रकार आला समोर
कल्याण तालुक्यातील केळणी आदिवासी वाडीत शारदा आणि मनिषा या दोघी जिवलग मैत्रिणी राहत होत्या. गेल्या शुक्रवारी आम्ही रानात जातो असे घरच्यांना सांगून घराबाहेर पडल्या. मात्र त्या दोघीही घरी परत आल्याच नाहीत. सोमवारी परिसरातील काही आदिवासी तरुण जंगलातील भाज्या आणण्यासाठी गेले असता शारदा आणि मनिषा यांचा मृतदेह झाडाला लटकलेला आढळून आला. हा प्रकार मुरबाड पोलिसांना समजताच ते घटनास्थळी होऊन पंचनामा करीत दोघीचेही मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी मुंबईच्या जे. जे. रुग्णालयात पाठण्यात आले आहे.
![खळबळजनक! दोघा मैत्रिणीचे मृतदेह जंगलात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/02:51:43:1623144103_mh-tha-1-murbad-1-photo-mh-10007_08062021132856_0806f_1623139136_857.jpg)