ETV Bharat / state

Dombivli Blue Water : डोंबिवलीत हिरवा पावसानंतर आता नाल्यातून वाहते आहे निळ्या रंगाचे पाणी - डोंबिवली निळे पाणी बातमी

डोंबिवली एमआयडीसी परिसर प्रदूषणामुळे ( Dombivli Pollution) कायमच चर्चेत राहिला आहे. दरम्यान, आता डोंबिवली एमआयडीसी येथील गणेश नगर नाल्यातून ( Blue Water In Ganesh Nagar Sewer ) निळ्या रंगाचे पाणी वाहत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामुळे या घटनेनंतर संबधित अधिकारी कारवाईचे कागदी घोडे नाचवत असल्याचे दिसून आले.

डोंबिवलीत पावसानंतर वेगवेगळ्या रंगाचे पाणी

author img

By

Published : Mar 28, 2022, 7:39 PM IST

Updated : Mar 29, 2022, 1:30 PM IST

ठाणे - डोंबिवली एमआयडीसी परिसर प्रदूषणामुळे ( Dombivli pollution) कायमच चर्चेत राहिला आहे. 2014 साली या परिसरात हिरवा पाऊस पडला होता. त्यांनतर रासायनिक निळा, गुलाबी रंगाचे रसायनयुक्त पाण्याच्या बातम्या पाहून थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ( CM Uddhav Thackeray In Dombivli ) गुलाबी रस्ताची पाहणी करून प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. मात्र, पुन्हा डोंबिवली एमआयडीसी येथील गणेश नगर नाल्यातून ( Blue Water In Ganesh Nagar Sewer ) निळ्या रंगाचे पाणी वाहत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामुळे या घटनेनंतर संबधित अधिकारी कारवाईचे कागदी घोडे नाचवत असल्याचे दिसून आले.

डोंबिवलीत हिरवा पावसानंतर आता नाल्यातून वाहते आहे निळ्या रंगाचे पाणी

उपाययोजना कागदावरच - डोंबिवली एमआयडीसी परिसर प्रदूषणामुळे कायमच चर्चेत राहिला आहे. 2014 साली या परिसरात हिरवा पाऊस पडला होता. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात प्रदूषीत सांडपाण्यामुळे रस्ता गुलाबी झाला होता. तर गेल्या वर्षी मार्च महिन्यात रस्त्यावर केमिकलच निळा पाणी पाहून परिसरात घबराट पसरली होती. विशेष म्हणजे मुख्यमंत्री ठाकरेंच्या डोंबिवली दौऱ्यानंतर सुरक्षिततेची उपाययोजना न करणाऱ्या 302 कारखान्यांची पाहणी करण्यात आली होती. त्यापैकी आौद्योगिक सुरक्षिततेची ऑडीट न करणाऱ्या 38 कारखानदारांच्या विरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्याने पुढील कारवाई थंडावली.

पर्यावरण मंत्री यांच आजोळ - प्रदुषणाचा प्रश्न कायम असून कंपन्यांची मुजोरी सुरूच असल्याचं दिसून येतं आहे. या नाल्याचं निळ्या रंगाचे पाणी सोमवारी दुपारी 2 वाजताचं आहे. संबंधित यंत्रणा ना वारंवार तक्रार करूनही कोणताच उपयोग होत नसल्याचा आरोप स्थानिक नागरिक उमेश भंडारे यांनी केला आहे. दरम्यान या परिसरातून रात्री 12 वाजेपर्यंत कंपन्यांमधून मोठमोठ्याने आवाज येत असल्याचंदेखील सांगितलं जाते आहे. या आधीसुद्धा प्रदूषणामुळे रस्त्या गुलाबी होणं आणि हिरवा पाऊस पडल्याच्या घटना घडल्या होत्या. मात्र, आता सवाल निर्माण होतो, तो दिवसाढवळ्या केमिकलचं पाणी नाल्यात सोडलं जात असल्यानं, कंपन्यांना नेमकं कोणाचं अभय आहे? डोंबिवली शहर हे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच आजोळ आहे. त्यामुळे प्रदूषणासारख्या गंभीर समस्येची दखल ते गांभीर्यानं घेतात का? ते पाहावं लागेल.

हेही वाचा - Chandrakant Patil Criticized CM : भाग्यवान माणूस जन्माला आला; चंद्रकांत पाटलांनी वाचली मुख्यमंत्री ठाकरेंची कुंडली

Last Updated : Mar 29, 2022, 1:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.