ETV Bharat / state

हे बरं नव्हं! मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच १०० रुपयांच्या रेशन किटचा काळाबाजार; एका किटची ३०० रुपयात विक्री - Chief Minister district

ठाण्यात गोरगरीब आदिवासी रेशनधारकाकडून १०० रुपयाची रेशन किटाची ३०० रूपयात विक्री होत आहे. त्यामुळे आदिवासी भागातील गोरगरीब आदिवासी बांधवांची फसवणूक ( Fraud of tribal brothers ) करणाऱ्या दुकानदाराविरोधात शहापूर तहसीलदारांकडे केली तक्रार दाखल करून कारवाईची मागणी केल्याने दिवाळी किटचा काळाबाजार उघडकीस आला आहे.

Chief Minister district
रेशन किटचा काळाबाजार
author img

By

Published : Oct 21, 2022, 5:35 PM IST

ठाणे : शिंदे सरकारने ( Eknath Shinde ) गाजावाजा करीत यंदाच्या दिवाळीत गोरगरीब रेशनधारकांना १०० रुपयाची रेशन किटाची स्वस्त ( Black market of ration kits ) धान्य दुकानदारात उपब्लध करून दिली. मात्र, मुख्ममंत्र्यांच्या जिल्हातच गोरगरीब आदिवासी रेशनधारकाकडून ३०० रूपयात विक्री शहापूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात होत आहे. त्यामुळे आदिवासी भागातील गोरगरीब आदिवासी बांधवांची फसवणूक ( Fraud of tribal brothers ) करणाऱ्या दुकानदाराविरोधात शहापूर तहसीलदारांकडे केली तक्रार दाखल करून कारवाईची मागणी केल्याने दिवाळी किटचा काळाबाजार उघडकीस आला आहे.

रेशन किटचा काळाबाजार

किटची ३०० रूपयात विक्री - शिंदे सरकारने गोरगरिबांची दिवाळी गोड करण्यासाठी १०० रुपयाचे किट स्वस्त धान्य दुकानातून देण्याची घोषणा केली होती. शासकीय धान्य गोदामात वस्तू स्वस्त धान्य दुकानांवर उशिरा का होई ना दिवाळीच्या रेशन किट पोहोचले. मात्र, स्वस्त धान्य दुकानदाराने १०० रूपयाची धान्याची किट ३०० रूपयाला विकत असल्याची धक्कादायक बाब शहापूर तालुक्यातील अतिदुर्गम भागातील फुगाळा, आगनवाडी येथील स्वस्त धान्य दुकानात घडली आहे. या दुकानाचा मालकाने १०० रूपयाची धान्याची किट ३०० रूपयाला विक्री करत असल्याचा आरोप करीत गावकऱ्यांनी शहापूर तहसीलदार यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत गोरगरिबांचे दिवाळे काढणाऱ्य या दुकानदारावर स्थानिक प्रशासन काय कारवाई करते हे पाहाणे महत्वाचे ठरणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.