ETV Bharat / state

'पुढे महाराष्ट्राची निवडणूक म्हणजे भाजपचा एकट्याचा लढा असेल' - BJP Maharashtra Rajya Parishad

राज्य परिषद अधिवेशनात बोलताना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी महाराष्ट्रातील भाजपच्या आगामी वाटचालीवर भाष्य केले. पुढील काळात महाराष्ट्राची निवडणूक म्हणजे भारतीय जनता पक्षाचा एकट्याचा लढा असेल. राजनीती पूर्ण विश्वासाने खेळा तुमच्यापुढे कोणीही टिकणार नाही. राजकीय पक्षात येण्याचा रस्ता आहे, जाण्याचा रस्ता नाही असा टोलाही नड्डा यांनी लगावला.

जे. पी. नड्डा
जे. पी. नड्डा
author img

By

Published : Feb 16, 2020, 7:43 PM IST

नवी मुंबई - सत्तेच्या माध्यमातून देशात परिवर्तन आणायचे आहे. 'खुर्ची' आमचे लक्ष नसून काम करण्याचे ते माध्यम आहे, असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा भाजपच्या राज्य परिषद अधिवेशनात बोलताना म्हणाले. महाराष्ट्राने देशाला एक दृष्टी दिली. महाराष्ट्र महान संतांची, छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर, महात्मा फुले यांची भूमी आहे, असे जे पी नड्डा म्हणाले.

देव परीक्षा त्याचीच घेतो ज्याच्यात हिंमत असते. पुढील काळात महाराष्ट्राची निवडणूक म्हणजे भारतीय जनता पक्षाचा एकट्याचा लढा असेल. राजनीती पूर्ण विश्वासाने खेळा तुमच्यापुढे कोणीही टिकणार नाही. राजकीय पक्षात येण्याचा रस्ता आहे, जाण्याचा रस्ता नाही असा टोलाही नड्डा यांनी लगावला.

भाजप हा पक्ष विचाराच्या आधारावर उभा असलेला पक्ष आहे. सगळे पक्ष वंशवाद परिवारवादावर उभे आहेत, मात्र भारतीय जनता पक्षच परिवार आहे. राष्ट्रवादी, शिवसेना, समाजवादी पक्ष व काँग्रेस यांचे अध्यक्ष कोण होणार आहेत, हे जगजाहीर आहे. मात्र, भाजप पक्ष असा आहे, तिथे पुढील अध्यक्ष कोण होणार हे सांगणे कठीण आहे. 'वोट बँक राजनीती' आमच्याकडे नाही. 1350 आमचे आमदार आहेत 17 कोटी सदस्यांचा आमचा पक्ष आहे. भारतीय जनता पक्ष जगातील सर्वात मोठा पक्ष आहे. आमच्याकडे स्थिती पाहून पाठिंबा बदलला जात नाही. भाजपचा कार्यकता अभिमानाने सांगू शकतो की, कालही आमचा होता, आजही आमचा आहे. उद्याही आमचा आहे, असेही नड्डा यांनी म्हणाले.

हेही वाचा - वैयक्तिक स्वार्थासाठी 'त्यांनी' जनादेशाचा अपमान केला - नड्डा

जे निर्णय कधीही होणार नव्हते ते निर्णय मोदी यांच्या नेतृत्वाखाली झाले आहेत. 303 खासदार भाजपने लोकसभेत पाठवले. देश काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत एक होऊ देत, असाच आम्ही विचार करत होतो. जम्मू काश्मीरचे लोक गुलामगिरीचे जीवन जगत होते. फुटीरतावादी द्वेष पसरवत होते. जम्मू काश्मीरमध्ये सफाई कर्मचारीचा मुलगा फक्त सफाई कर्मचारी बनू शकत होता. सफाई कर्मचारीचा मुलगा आता डॉक्टर, अभियंता 307 हटवल्यामुळे बनू शकतो. काश्मीरमध्ये भारत सरकारचा पैसा घ्या आणि जे वाट्टेल ते करा, हेच सुरू होते. मात्र, आता ज्यांनी भ्रष्टाचार केला आहे, ते एक तर जेलमध्ये असतील किंवा जामिनावर असतील असेही ते म्हणाले.

त्यामुळे आम्ही तिहेरी तलाक रद्द करण्याचा निर्णय घेतला

आम्ही जर सतीप्रथा, हुंडा पद्धत, बालविवाह बंद करू शकतो, तर मुस्लीम महिलांवर अन्याय का? त्यामुळे आम्ही तिहेरी तलाक रद्द करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान हे मुस्लीम देश आहेत. तिथे तिहेरी तलाक बंद आहे. आमच्यासाठी देश पहिला आहे, मग सत्ता, कोण खुश असेल कोण नाखूष असेल याची चिंता आम्ही देशहिता पुढे करत नाही. मोदींच्या नेतृत्वाखाली दहशतवादी व त्यांच्या काळ्या करावायांवर रोख लागली आहे.आम्ही लोकसभेत सादर केलेल बजेट दूरदृष्टीने केलेले बजेट आहे, असेही ते म्हणाले.

हेही वाचा - तुमच्यात हिंमत असेल तर लावा नवीन निवडणूक; तुम्ही तिघे आम्ही एकटे

महाराष्ट्रात आमचे सरकार नाही, त्यामुळे आजच्या घडीला महाराष्ट्रामध्ये विकास थांबला जात आहे. जलयुक्त शिवारचे काम जे देवेंद्र फडणवीस यांच्या काळात झाले, ते आजपर्यंत कधीही झाले नाही. जनादेशाला धाब्यावर बसवून महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. व्यक्तिगत स्वार्थासाठी जनदेशाचा अपमान करण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.