ETV Bharat / state

केडीएमसीच्या फुटपाथ क्लिअरन्स मोहिमेला भाजपचा विरोध ; अडथळा आणणाऱ्या फेरीवाल्यांवर गुन्हे दाखल

स्मार्ट सिटीच्या कामावरून एकीकडे भाजपचे खासदार, आमदार नाराजी व्यक्त करतात. दुसरीकडे शहरातील फुटपाथवर अतिक्रमण करून बसलेल्या फेरीवाल्यांचे समर्थन करायचे, असा पवित्रा भाजपने घेतल्याने दक्ष नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

फुटपाथ क्लिअरन्स मोहीम विरोध
फुटपाथ क्लिअरन्स मोहीम विरोध
author img

By

Published : Nov 3, 2020, 3:51 PM IST

ठाणे - कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील फेरीवाल्यांसह दुकानदारांनी फुटपाथवर अतिक्रमण केले असून पालिकेच्या अतिक्रमण पथकाकडून १ नोव्हेंबरपासून फुटपाथ क्लिअरन्स मोहिमेला सुरुवात करण्यात आलेली आहे. मात्र, आधीच कोरोनामुळे हातावर पोट असणाऱ्या फेरीवाल्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यातच आता या कारवाईमुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाल्याचे सांगत भाजपने फेरीवाल्यांवरील कारवाईला विरोध केला.

कारवाईत अडथडा आणणाऱ्या फेरीवाल्यांसह त्यांच्या कुटुंबांवर पालिकेने खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत. यामुळे स्मार्ट सिटीच्या कामावरून एकीकडे भाजपचे खासदार, आमदार नाराजी व्यक्त करतात आणि दुसरीकडे शहरातील फुटपाथवर अतिक्रमण करुन बसलेल्या फेरीवाल्यांचे समर्थन करायचे, असा पवित्रा भाजपने घेतल्याने दक्ष नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

कल्याणमधील अतिक्रमण कारवाईला विरोध

फुटपाथ क्लिअरन्स मोहिमेला विरोध करणाऱ्या फेरीवाल्यांवर गुन्हे दाखल

पदपथावरील अतिक्रमण निर्मुलनाची मोहीम सुरू करण्याचे निर्देश पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सर्व प्रभागक्षेत्र अधिकाऱ्यांना दिले होते. त्याअनुषंगाने सर्व प्रभागक्षेत्र अधिकाऱ्यांनी त्यांच्या संबंधित प्रभागक्षेत्रात पदपथावरील अतिक्रमणे हटवण्याची धडक मोहीम सुरू केली. मात्र, 'अ' प्रभाग क्षेत्रातील एनआरसी कंपनी समोरील मोहने गेट परिसरातील फेरीवाल्यांनी कारवाईदरम्यान अतिक्रमण पथकाला शिवीगाळ केली होती व कारवाईत अडथळा आणला होता. त्यामुळे, महापालिकेच्या अतिक्रमण पथकातील कर्मचारी देवानंद भोंगाडे यांनी कारवाईदरम्यान शिवीगाळ व धक्काबुक्की करणाऱ्या शंकर गुप्ता व त्यांच्या पत्नीसह मुलावर सरकारी कामात अडथडा आणून धक्काबुक्की केल्याचा गुन्हा खडकपाडा पोलीस ठाण्यात दाखल केला.

भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव

एकीकडे कल्याण डोंबिवली शहर स्मार्ट सिटी करण्याचे पंतप्रधान मोदींचे स्वप्न आहे. ते साकार करण्यासाठी भाजपचे खासदार, आमदार सत्ताधारी शिवसेनेसह पालिका प्रशासनावर स्मार्ट सिटी प्रकल्पांच्या संथगतीने सुरू असलेल्या कामांबाबत बैठकीत नाराजी व्यक्त करतात. दुसरीककडे स्मार्ट सिटी म्हणजे कचरामुक्त शहर. मात्र, रस्त्यात व फुटपाथवर अतिक्रमण करून बस्तान मांडणाऱ्या फेरीवाल्यांमुळे सर्वत्र कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. याच फेरीवाल्यांवर होत असलेल्या कारवाईला भाजपच्या कल्याण जिल्हा महिला सरचिटणीस पुष्पा रत्नपारखी यांनी विरोध केला असून फेरीवाल्यांवरील कारवाई थांबवण्यासाठी त्यांनी पालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे. त्यामुळे, भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे दिसून आले आहे.

हेही वाचा- दिवाळीत होणारी गर्दी पाहता, बाजार पेठेत मास्क, स्क्रिनिंग होणे आवश्यक - आमदार नाईक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.