ETV Bharat / state

भाजप पदाधिकाऱ्याची पत्नी निघाली 'सौ. ४२०', पाच वर्षांत सात जणांना लाखोंचा गंडा

मागील 5 वर्षांत 7 जणांना नोकरी लावण्याच्या आमिष दाखवत लाखोंचा गंडा घालणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीला पोलिसांनी अटक केली आहे.

किरण फुंदे
किरण फुंदे
author img

By

Published : Dec 20, 2019, 6:33 AM IST

Updated : Dec 20, 2019, 7:31 AM IST

ठाणे - भाजपच्या पदाधिकाऱ्याच्या पत्नीच सौ. ४२० निघाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या सौ. ४२० महिलेने उल्हासनगरात राहणाऱ्या एका तरुणीला नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत गंडा घातल्या प्रकरणी मध्यवर्ती पोलिसांनी तिला अटक केली आहे.

माहिती देताना पोलीस निरीक्षक

किरण दिलीप फुंदे असे पोलिसांनी अटक केलेल्या सौ. ४२० चे नाव आहे. धक्कादायक बाब म्हणजे या महिलेने गेल्या 5 वर्षांत 7 जणांना नोकरी लावून देण्याचे आमिष दाखून लाखोंचा गंडा घातल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

उल्हासनगर कॅम्प 3 मधील प्रबुद्ध नगर येथे पूजा खरात ही 23 वर्षीय विद्यार्थिनी राहते. तिला वर्षभरापूर्वी नोकरीची नितांत गरज होती. ही गोष्ट हेरून भाजप पदाधिकारी दिलीप फुंदे यांच्या पत्नी किरण हिने ते हेरले. तिने 17 जानेवारी 2018 ला पूजाला ठाण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात सफाई कर्मचाऱ्याचे काम देण्यासाठी 75 हजार रुपये घेतले. मात्र, नोकरी लावली नाही. त्यामुळे पूजाचे वडील तात्या खरात यांनी किरण फुंदेंकडे पैशाची मागणी केली असता, खरात यांच्या नावे आरोपी महिलेने 60 हजार रुपयांचा धनादेश दिला. मात्र, तोही बाद केला. अखेर आपली फसवणूक झाली आहे, हे समजल्यावर पूजा खरात हिने मध्यवर्ती पोलीस ठाणे गाठत किरण फुंदे हिच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

हेही वाचा - ठाण्यात मनसे आमदारांची कार पुलावरून थेट रेल्वे रुळावर कोसळली

त्यानंतर तपासाची यंत्रणा फिरवत वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर सुरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अस्लम खातीब, पोलीस उप निरीक्षक योगेश गायकर, महिला पोलीस हवालदार चोपडे, सहायक पोलीस उप निरीक्षक आर.डी. पाटील, पोलीस नाईक कामडी, पोलीस शिपाई शिंदे यांनी तिला अटक केली. तिला गुरूवारी (दि. 19 डिसें) न्यायालयात हजर केले असता, 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर सुरडकर यांनी सांगितले की, किरण फुंदे ही सराईत गुन्हेगार आहे. यापूर्वी 2015 ते 2019 ह्या कालावधीत खडकपाडा पोलीस ठाण्यात 4, महात्मा फुले पोलीस ठाण्यात एक आणि मध्यवर्ती पोलीस ठाण्यात एक असे 6 फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. तसेच आरोपी महिलेला बेरोजगार तरुण-तरुणींना हेरून त्यांना नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करण्याची सवय असल्याचे सुरडकर यांनी सांगितले.

हेही वाचा - ऐन लग्न समारंभात किरकोळ वादातून तरुणाचा खून; आरोपी अटकेत

Intro:kit 319Body:भाजप पदाधिकाऱ्याची पत्नी निघाली सौ. ४२० ; पाच वर्षात सात जणांना लाखोंचा गंडा

ठाणे : भाजपच्या  पदाधीकाऱ्याची पत्नीच सौ. ४२० निघाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या सौ. ४२० महिलेने उल्हासनगरात राहणाऱ्या एका तरुणीला नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत गंडा घातल्या प्रकरणी मध्यवर्ती पोलिसांनी तिला अटक केली आहे.
किरण दिलीप फुंदे असे पोलिसांनी अटक केलेल्या सौ. ४२० चे नाव आहे. धक्कादायक बाब म्हणजे ह्या महिलेने गेल्या पाच वर्षात सात जणांची नोकरी लावून देण्याचे आमिष दाखून लाखोंचा गंडा घातल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.
उल्हासनगर कॅम्प 3 मधील प्रबुद्ध नगर येथे पूजा खरात ही 23 वर्षीय विद्यार्थिनी राहते. तिला वर्षभरापूर्वी नोकरीची नितांत गरज होती. ही गोष्ट हेरून भाजप पदाधिकारी दिलीप फुंदे यांच्या पत्नी किरण हिने ते हेरले. तिने 17 जानेवारी 2018 ला पूजाला ठाण्याच्या कलेक्टर कार्यालयात सफाई कर्मचारी हे काम देण्यासाठी 75 हजार रुपये घेतले. मात्र नोकरी लावली नाही. त्यामुळे पुजाचे वडील तात्या खरात यांनी किरण फुंदे कडे पैश्याची मागणी केली असता खरात यांच्या नावे आरोपी महिलेने 60 हजार रुपयांचा धनादेश दिला, मात्र तो ही बाऊन्स केला. अखेर आपली फसवणूक झाली आहे, हे समजल्यावर पूजा खरात हिने मध्यवर्ती पोलीस ठाणे गाठत किरण फुंदे हिच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
त्यानंतर तपासाची यंत्रणा फिरवत वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर सुरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अस्लम खातीब, पोलीस उप निरीक्षक योगेश गायकर, महिला पोलिस हवालदार चोपडे, सह पोलीस उप निरीक्षक आर. डी. पाटील, पोलीस नाईक कामडी, पोलीस शिपाई शिंदे यांनी तिला अटक केली. तिला आज न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर सुरडकर यांनी सांगितले की किरण फुंदे ही सराईत गुन्हेगार आहे. यापूर्वी 2015 ते 2019 ह्या कालावधीत खडकपाडा पोलीस ठाण्यात चार, महात्मा फुले पोलीस ठाण्यात एक आणि मध्यवर्ती पोलीस ठाण्यात एक असे सहा फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. तसेच आरोपी महिलेला बेरोजगार तरुण - तरुणींना हेरून त्यांना नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करण्याची सवय असल्याचे सुरडकर यांनी सांगितले.

बाईट / सुधाकर सुरडकर (वरिष्ठ पोलीस निरीक्षक)

Conclusion:ulhansgar
Last Updated : Dec 20, 2019, 7:31 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.