ठाणे - भाजपा- मनसे युतीच्या चर्चा म्हणजे सहजच कोणी कोणाची भेट आणि चर्चा झाली म्हणून पतंग उडवण्यात मजा नाही. प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवण्याचा अधिकार असून अशा प्रकारच्या सर्व कल्पना खऱ्या नसतात, असे मत भाजपा नेते विनोद तावडे यांनी कल्याण पूर्वेतील भाजपा मेळाव्यानंतर व्यक्त केले. शिवाय नाशिक महापालिका निवडणुकी विषयी मनसेने भूमिका उघड केल्याचे सांगत भाजपा-मनसे युतीवर विनोद तावडे यांनी केलेल्या विधानामुळे सध्या तरी पतंगासारखी हवेतच भाजप-मनसे युतीची चर्चे सुरु असल्याचे दिसून आले आहे, असेही तावडे म्हणाले.
आगामी निवडणुकीकरीता आपल्याला उतरवल्याचा कोणताही विषय नाही. गेल्या 2 वर्षांपासून आपल्यावर पक्षाने हरियाणाची जबाबदारी सोपवल्याने साहजिकच आपले बऱ्यापैकी तिकडे जाणे होते. तर 10 दिवस आपण महाराष्ट्रात फिरत असतो आणि महाराष्ट्रातील आपला प्रवास यापुढेही असणार, असे सूचक विधान भाजपा नेते विनोद तावडे यांनी केले. कल्याण पूर्वेतील भाजपाच्या कार्यकर्ता मेळाव्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी हे सूचक विधान केले. दरम्यान गेल्या अनेक महिन्यांपासून महाराष्ट्राच्या राजकारण सक्रीय दिसत नसल्याबद्दल त्यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी या प्रश्नावर कोणतेही भाष्य केले नाही.