ठाणे- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या साडे सहा महिन्यांपासून सर्व धार्मिक स्थळे, मंदिरे पूर्णपणे बंद आहेत. अनलॉकनंतर अनेक व्यवसाय सुरू करण्याची राज्य सरकारने परवानगी दिली. दारूची दुकाने उघडली. मात्र, मंदिरे का उघडत नाही, असा प्रश्न विचारत भाईंदर पश्चिमच्या राम मंदिर बाहेर भाजप कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत महाविकास आघाडी सरकारकडे मंदिरे उघडण्याची मागणी केली.
संपूर्ण जगात कोरोनानी हाहाकार माजवला आहे. या महामारीमुळे जग ठप्प झाले होते. काही कालावधी नंतर अनेक ठिकाणी दळणवळणाला सुरुवात झालेली आहे. राज्य सरकारने अत्यावश्यक सेवेसाठी रेल्वे सेवा, परिवहन सेवा सुरू केली आहे, तर आस्थापना दुकाने, मद्यपानची दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, धार्मिक स्थळे उघडण्यास अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. साडे सहा महिन्यांपासून मंदिरे बंद आहेत, ती उघडा अशी मागणी पुजारी वर्ग देखील करत आहे. मंदिरे उघडण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
या मागणीसाठी राज्यातील अनेक धार्मिक स्थळांमध्ये भाजपाच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे. मीरा भाईंदर मधील राम मंदिर बाहेर भाजपा कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत मंदिरे उघडण्याची मागणी केली. साडे सहा महिन्यांपासून मंदिरे बंद आहेत, ती उघडा अशी मागणी पुजारी वर्ग देखील करत आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे, भाजपा प्रवक्ते रणवीर वाजपेयी, नगरसेविका वर्षा भानुशाली, दिपाली मोकाशी, सुरेश खंडेलवाल, पंकज पांडे, सुनीता भोईर व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
हेही वाचा- अनधिकृत प्लांटमार्फत केमिकल गाळाचे विघटन, युवा सेनेकडून पर्दाफाश