ETV Bharat / state

Thane News: ठाण्यात आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी शिवसेना भाजप गटात राडा; भाजपच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल - आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी शिवसेना भाजप गटात राडा

आनंदनगर भागात शिवसेना गट आणि भाजपमध्ये राडा झाल्याचा प्रकार गुरुवारी रात्री उघडकीस आले आहे. दिलेल्या तक्रारीच्या आधारे भाजपचे पदाधिकारी प्रमोद चव्हाण यांच्याविरोधात ॲट्रोसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Thane News
आक्षपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
author img

By

Published : Apr 21, 2023, 1:19 PM IST

भाजपच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

ठाणे: ठाण्यात गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर पोस्ट केल्याप्रकरणी तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे. गुरूवारी रात्री ठाण्याच्या कोपरी परिसरात शिवसेना आणि भाजप मध्ये तुफान राडा पाहायला मिळाला. शिवसेनेचे समन्वयक प्रवक्ते नरेश म्हस्के याच्य विरोधात आक्षेपार्ह मजकूर सोशल मीडियावर पोस्ट केल्याप्रकरणी, भाजपच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे गुरूवारी शिवसेना आणि भाजप कोपरी आनंद नगर या ठिकाणी आमने सामने आल्याचे पाहायला मिळाले.

अट्रोसिटी प्रमाणे गुन्हा दाखल: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक आणि माजी महापौर नरेश म्हस्के यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट आणि शिवसैनिकांना जाती वाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी भाजप कार्यकर्ते प्रमोद चव्हाण यांच्या विरोधात कोपरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक शिवसेना नाशिक संपर्क प्रमुख संजय बच्छाव आणि शिवसेना विभाग प्रमुख किरण गायकवाड यांनी हा गुन्हा दाखल केला आहे. यावेळी शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला आहे. दरम्यान काही दिवसापूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वाचलय येथील भाजपच्या कार्यकर्त्यांनी ते बॅनर काढून स्वतःच्या पक्षाचे बॅनर लावले होते. या वरून मोठा वाद झाला होता. या वादानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी आक्षेपार्ह पोस्ट केली होती. त्यामुळें परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. कोपरी पोलिसानी भाजप कार्यकर्ते प्रमोद चव्हाण यांच्या विरोधात १५३ आणि अट्रोसिटी प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. तर चव्हाण यांना अटक देखील करण्यात आली आहे. एकीकडे राज्यात शिंदे फडणवीस सरकार अस्तित्वात असताना ठाण्यात मात्र शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलीच जुंपली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आता या वाद कुठपर्यंत जातो हेच पाहणे आवश्यक आहे.

अनेकदा भेटले होते शिवसेना भाजप कार्यकर्ते: ठाण्यात शिवसेना आणि भाजप यांचा वाद हा नवीन नाही. आतापर्यंत अनेकदा या दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांच्या समोर उभे राहुन लढले आहेत. भाजप नेते मिलिंद पाटणकर यांच्या मारहाण प्रकरणानंतर आतापर्यंत अनेकदा सेना भाजपामध्ये वादाची ठिणगी पेटली. तर हे प्रकरण गुन्हा दाखल करण्यापर्यंत देखील गेलेली आहेत. याच पार्श्वभूमीवर महापालिका निवडणुका हे दोन्ही पक्ष एकत्र कसे लढतील हाच प्रश्न विचारला जात आहे.

हेही वाचा: Illegal Hospital Sealed भिवंडीत अवैधरित्या सुरू असलेल्या हयात हॉस्पिटलला अखेर सील परिचारिकेविरुद्ध गुन्हा दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.