ETV Bharat / state

Mumbai Bhivandi Crime News : पाण्याच्या वादातून शेजारी बनले पक्के वैरी; हाणामारीत एकाचा मृत्यू, तर दुसरा तुरुंगात - Mumbai Bhivandi Crime News

भिवंडीत पाण्याच्या वादातून दोन शेजाऱ्यांमध्ये ( Bitter Fight Between Two Neighbors ) कडाक्याचे भांडण होऊन हाणामारी झाली. या हाणामारीत दुसऱ्या मजल्यावरून ( Water Dispute Leaves One Dead Other in Jail ) तोल जाऊन दोघेही इमारतीच्या खाली पडल्याने त्यामध्ये एका शेजाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरा गंभीर झाला आहे. ही घटना भिवंडी शहरातील काटई नाका परिसरातील इमारतीत घडली ( Katai Naka area of ​​Bhiwandi City ) आहे. याप्रकरणी दुसऱ्या शेजाऱ्यावर निजामपूरा पोलीस ठाण्यात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Mumbai Bhivandi Crime News
पाण्याच्या वादातून शेजारी बनले पक्के वैरी
author img

By

Published : Nov 3, 2022, 8:26 PM IST

ठाणे : शेजार धर्म म्हटले की सुख-दुःखात एकमेकांच्या मदतीसाठी ( Bitter Fight Between Two Neighbors ) धावत येतात, असे सांगितले जाते. मात्र, एका इमारतीमध्ये शेजारी-शेजारी राहणारे दोघे ( Water Dispute Leaves One Dead Other in Jail ) तरुण पाण्याच्या वादातून पक्के वैरी होऊन दोघांत हाणामारी ( Katai Naka area of ​​Bhiwandi City ) झाली. या हाणामारीत दुसऱ्या मजल्यावरून तोल जाऊन दोघेही इमारतीच्या खाली पडल्याने त्यामध्ये एका शेजाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरा गंभीर झाला आहे. ही घटना भिवंडी शहरातील काटई नाका परिसरातील इमारतीत घडली आहे. याप्रकरणी दुसऱ्या शेजाऱ्यावर निजामपूरा पोलीस ठाण्यात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुषार सिंग असे गुन्हा दाखल झालेल्या शेजाऱ्याचे नाव आहे. तर सादीक कासिम अन्सारी (२६) असे जागीच मृत्यू झालेल्या शेजाऱ्याचे नाव आहे.

भिवंडीतील कटाई भागातील चाचा लाईफ स्टाईल इमारतीतील प्रकार : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,मृत सादीक आणि आरोपी तुषार हे दोघेही भिवंडीतील कटाई भागातील चाचा लाईफ स्टाईल नावाच्या इमारतीमधील दुसऱ्या मजल्यावर राहतात. त्यातच २ ऑक्टोंबर रोजी रात्री साडेदहा वाजल्याच्या सुमारास मृत सादिकने पिण्याचे पाणी आणले नाही. या कारणामुळे दोघांत वाद होऊन आरोपी तुषारने मृतकला उद्धटपणे बोलून त्याच्या शर्टाची कॉलर पकडून शिवीगाळ करीत धक्काबुक्की केल्याने दोघांमध्ये वाद अधिक वाढला आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले.

एकाचा जागीच मृत्यू, तर दुसरा तुरुंगात : दोघात हाणामारी सुरु असतानाच, दोघांचाही दुसऱ्या मजल्यावरील पॅसेजमधून तोल जाऊन दोघेही खाली पडले. यामध्ये सादीकच्या नाकातून, पायातून आणि गुप्तांगातून रक्तस्त्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी मृतकच्या नातेवाईकाने निजामपूर पोलीस ठाण्यात आज पहाटे ५ वाजता तुषार विरोधात तक्रार दिली. या तक्रारीवरून भादंवी कलम ३०४, ३२३, ५०४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आशिष पवार करीत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.