ठाणे - उल्हासनगरच्या व्हिनस चौक येथील जिओ गॅलरी समोर अल्पवयीन विद्यार्थ्यांने दुचाकी लंपास केल्याची घटना समोर आली आहे. हा चोरटा दुचाकी लंपास करत असताना त्याचा कारनामा सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
जिल्ह्यात आणि जिल्ह्यातील उपनगरात सध्या चोरीच्या घटनेत वाढ झाली आहे. आता तर चक्क उल्हासनगरमधील जिओ गॅलरी समोरील पार्किंगमधून एका अल्पवयीन मुलाने दुचाकीची चोरी केली आहे. त्यामुळे गुन्हेगारांना पोलिसांची भीती राहिलेली नाही, असे नागरिक बोलत आहे. या घटनेप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात या अल्पवयीन चोरट्या विरोधात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्याचा शोध सुरू केला आहे.