ETV Bharat / state

Thane Crime : धक्कादायक! अंगावर थुंकल्याच्या वादातून दुचाकीचालकाचा भर रस्त्यात खून; घटना सीसीटीव्हीत कैद - ठाणे क्राईम

ठाणे जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका बाईक चालकाने रस्त्यावर थुंकले, दरम्यान ही थुंकी रस्त्यावरून पायी चालत असलेल्या व्यक्तीच्या अंगावर उडल्यामुळे दोघांमध्ये वाद ( dispute over spitting on his body ) झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्यामुळे बाईक चालक विजय पटवा गंभीर जखमी झाले. उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू ( Bike driver killed ) झाला. आरोपी कैफ खान याला न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Dec 11, 2022, 7:52 PM IST

दुचाकीचालकाचा भर रस्त्यात खून; घटना सीसीटीव्हीत कैद

ठाणे: दुचाकीचालक रस्त्याने जात असतानाच पायी जाणाऱ्या तरुणाच्या अंगावर थुंकल्याच्या वादातून दोघांमध्ये वाद होऊन तरुणाने भर रस्त्यात दुचाकी चालकाचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली ( Bike driver killed ) आहे. ही घटना डोंबिवली पश्चिमेकडील राजू नगर परिसरातील रस्त्यावर घडली आहे. याप्रकरणी विष्णुनगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे. कैफ जावेद खान ( वय, १९, रा, मुंब्रा ) आहे अटक तरुणाचे नाव आहे. तर विजय पटवा (वय ५२,) असे खून झालेल्या दुचाकी चालकाचे नाव आहे.

थुंकण्यावरून वाद आणि थेट खून: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डोंबिवली पश्चिमेकडील राजू नगर परिसरातील रस्त्यावरून काल दुपारच्या सुमारास मृत विजय पटवा हे दुचाकीने जात होते. त्याच सुमारास आरोपी कैफ हा रस्त्याने पायी जात होता. तितक्यात मृत विजय हा अचानक दुचाकी चालवत असतानाच त्यांनी रस्त्यावर थुंकले. ही थुंकी कैफ खान याच्या अंगावर उडाल्याने विजय पाटवा यांना कैफने जाब विचारला असता, दोघांमध्ये वाद ( dispute over spitting on his body ) सुरू झाला. काही क्षणातच वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. कैफ खान याने विजय यांना ठोशा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. लाथ बुक्क्या मारल्याने विजय रस्त्यावरच जमिनीवर पडल्याने बेशुद्ध झाला. त्यानंतर काही नागरिकांनी गंभीर जखमी अवस्थेत विजय पाटवा यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान विजय यांचा मृत्यू झाला.

दोन दिवसांची पोलीस कोठडी: हा सर्व प्रकार सीसीटिव्ही कॅमेरा मध्ये कैद झाला आहे. या प्रकरणी विष्णू नगर पोलीस ठाण्यात कैफ खान विरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली आहे. आरोपी कैफ याला आज सुट्टीच्या विशेष न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास एपीआय राहुल खिल्लारे करीत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.