ETV Bharat / state

देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 5 फेब्रुवारीला होणार प्रमोद महाजन कलादानाचे भूमिपूजन - Thane district news

मीरा-भाईंदर महापालिकेच्या क्षेत्रात उभारण्यात येणाऱ्या दिवंगत प्रमोद महाजन कलादालनाचे भूमिपूजन व अग्निशमन विभागाच्या वाहनाचे लोकार्पण विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. हा सोहळा 5 फेब्रुवारीला होणार आहे.

पत्रकार परिषद
पत्रकार परिषद
author img

By

Published : Jan 30, 2021, 9:01 PM IST

Updated : Jan 31, 2021, 6:54 PM IST

मीरा भाईंदर (ठाणे) - मीरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात बांधण्यात येणाऱ्या दिवंगत प्रमोद महाजन कलादालनाचे भूमिपूजन व अग्निमशन विभागाच्या ताफ्यात येणार्‍या अद्ययावत टर्न टेबल लॅडर (टीटीएल) या वाहनाचे लोकार्पण, विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी बीएसयूपी प्रकल्पातील बाधित लाभार्थ्यांना गाळ्याचे वितरणही त्यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती महापौर ज्योत्स्ना हसनाळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

माहिती देताना महापौर

दिवंगत प्रमोद महाजन सभागृहसाठी 40 कोटी खर्च

यावेळी महापौर हसनाळे म्हणाल्या, प्रमोद महाजन कलादालनाच्या बांधकामासाठी सुमारे 40 कोटी इतका खर्च येणार असून या आर्थिक व प्रशासनिक खर्चास महासभेने मंजूरी दिली आहे.

अग्निशमन दलात एक टर्न टेबल लॅडर

मीरा-भाईंदर शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून नवनव्या टोलेजंग इमारती येथे उभारत आहेत. या शहरातील नागरिकांना उत्तम व अद्ययावत अग्निशमन सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी अग्निशमन विभागाच्या ताफ्यात 68 मीटर उंचीचे टर्न टेबल लॅडर (टीटीएल) हे वाहन शामिल करण्यात आले आहे. या वाहनामध्ये उद्वाहक (लिफ्ट)ची सोय देखील करण्यात आली असून अशा प्रकारचे वाहन खरेदी करणारी मीरा-भाईंदर महानगरपालिका ही राज्यातील पहिलीच महापालिका ठरली आहे, असेही त्यांनी सांगितले.

बीएसयूपी योजनेचे गाळे वाटप

काशिमीरा येथील जनता नगर व काशीचर्च या ठिकाणच्या बीएसयूपी प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. या प्रकल्पाअंतर्गत जनता नगर येथील इमारत क्र.6 चे काम पूर्णत्वास आलेले आहे. या इमारतीमधील 18 गाळे असून हे गाळे याच दिवशी प्रलक्पबाधित लाभार्थ्यांना वितरीत केले जाणार आहेत.

बोगस लाभार्थ्यांवर होणार कारवाई

बीएसयूपी योजनेत बोगस लाभार्थ्यांचा समावेश असल्यास या लाभार्थ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात करावे, असे आदेश महापौरांनी आयुक्त डॉ. विजय राठोड यांना दिले आहेत. या प्रकल्प बाधितांसाठी संक्रमण शिबिरे उभारण्यात आली असून या ठिकाणचे गाळे लाभार्थ्यांनी भाडेतत्वावर परस्परपणे दिल्यास त्यांच्यावरही कारवाई केली जाईल.

हेही वाचा - शहापूरात निलगायीचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू

Last Updated : Jan 31, 2021, 6:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.