ठाणे - भिवंडी-वाडा राष्ट्रीय मार्गाची खूपच दैनी अवस्था झाली असून या मार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहे. मात्र, पावसाळ्यापूर्वी खड्डे बुजविण्याची थातुरमातुर मलमपट्टी केलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांना तलावांचे स्वरूप आले आहे. रस्ते प्रशासनाने आणि टोलवसुली करणाऱ्या कंपनीने खड्डे दुरुस्ती न केल्याच्या निषेधार्थ सरकराचे लक्ष वेधण्यासाठी स्पीड बोट व जॅकेट घालून खड्यात बोट चालवून काही तरुणांचे अनोखे आंदोलन केले आहे.
प्रत्येक पावसात मार्ग खड्डेमय -
भिवंडी ते वाडा हा ४० कि.मी. अंतराचा रस्ता निकृष्ट दर्जाचा झाला असून प्रत्येक पावसात हा मार्ग खड्डेमय होताना दिसतो. त्यावर थातूरमातूर डागडुजी केली जाते. पुन्हा पावसाळ्यात ‘ये रे माझ्या मागल्या’ अशीच स्थिती होते. या रस्त्याच्या अपूर्ण कामाकडे लक्ष वेधण्यासाठी पाच वर्षात अनेक आंदोलने झाली. मात्र प्रशासन याकडे गांभीर्याने बघत नसल्याने आजही निष्पाप लोकांचे जीव जात असून कित्येकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. याचा अनोख्या पद्धतीने निषेध नोंदविण्यासाठी तरुणांनी भिवंडी-वाडा मार्गावर बोटिंग प्रवास सुरु केल्याचे फलक हातात घेतलेला व्हिडिओ व्हायरल करून राज्य सरकराचे लक्ष वेधले आहे.
हेही वाचा - बार्शीत आमदार राजेंद्र राऊत आणि पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांच्यात खडाजंगी