ETV Bharat / state

भिवंडीत पोलिसांच्या छाप्यात घातक शस्त्रांसह नशेची औषधे जप्त; चार जणांना अटक - court

अटकेतील आरोपी हे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले आहेत. जैतुनपूरा भागात या सर्वांची दहशत पसरली होती. या दहशतीमधून नागरिकांची मुक्तता व्हावी यासाठी स्थानिकांनी शहर पोलीस ठाण्यात लेखी तक्रारी दाखल केल्या होत्या.

आरोपींसह पोलीस
author img

By

Published : May 14, 2019, 10:52 PM IST

ठाणे - भिवंडी शहरातील जैतूनपुरा येथील राहत्या घरात दुकान व खानावळ उघडून त्याद्वारे नशेच्या गोळ्या व घातक शस्त्रे विक्री करत असल्याप्रकरणी भिवंडी शहर पोलिसांनी चार भावांना अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींच्या घरी छापा टाकून गावठी पिस्तूल, धारदार सुरे, चाकू व नशेच्या गोळ्यांचा साठा जप्त केला आहे. तर यावेळी आरोपींचा वडील फरार होण्यात यशस्वी झाला आहे.

भिवंडी शहर पोलीस ठाणे

नईम खलील मोमीन (३३), नदीम उर्फ आयबा खलील मोमीन(२५), कलीम खलील मोमीन (२६), वसीम खलील मोमीन (२८) (सर्व राहणार, जैतूनपुरा) असे अटक केलेल्या भावांची नावे आहेत. तर या आरोपींचा वडील खलील उर्फ सरदार उर्फ ताजीयावाले मोहम्मद बशीर मोमीन (६३) हा फरार होण्यात यशस्वी झाला आहे. पोलीस कारवाई झालेल्या या मोमीन बंधूंची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. त्यांनी संगनमताने राहत्या घरात दुकान व खानावळ उघडून त्याद्वारे नशेच्या गोळ्या व घातक शस्त्रे विक्री करीत होते. त्यामुळे जैतूनपुरा भागात या सर्वांची दहशत पसरली होती. या दहशतीमधून नागरिकांची मुक्तता व्हावी, यासाठी स्थानिकांनी शहर पोलीस ठाण्यात लेखी तक्रारी दाखल केल्या होत्या.

नागरिकांच्या तक्रारीची गंभीर दखल घेत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला एपीआय रोहिणी सोनार, पोलीस उपनिरीक्षक शरद बरकडे आदींच्या पोलीस पथकाने आरोपींच्या भिवंडी शहरातील जैतुनपूरा येथील घरी सायंकाळी छापा टाकला. यावेळी घटनास्थळी ५ हजार किंमतीचे गावठी पिस्तूल, ५०० रुपये किंमतीचे जिवंत काडतूस, पाच सुरे, २ सूरी, एक तलवार आदी घातक शस्त्रे आणि ४ हजार ५५० रुपये किंमतीच्या नशेच्या गोळ्या व गुटखा तसेच ७४ हजार रुपयांची रोकड आदी मुद्देमाल आढळून आल्याने तो जप्त करण्यात आला आहे.

अटक केलेल्या आरोपींना मंगळवारी भिवंडी न्यायालयात हजर केले असता त्यांना २० मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर आरोपी नदीम याची प्रकृती बिघडल्याने त्याची रवानगी तळोजा कारागृहात करण्यात आली आहे.

पोलिसांच्या छाप्यात घातक शस्त्रांसह नशेची औषधे जप्त; चार जणांना अटक 

ठाणे :- भिवंडी शहरातील जैतुनपूरा येथील राहत्या घरात घातक शस्त्रांसह नशेच्या औषधांचा साठा करून त्याची विक्री करीत असल्याची खबर मिळाल्याने  भिवंडी शहर पोलिसांनी छापा टाकून गावठी पिस्तूल, धारदार सुरे, चाकू व नशेच्या गोळ्यांचा साठा जप्त करून गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या  चौघा भावांना ताब्यात घेऊन अटक केली आहे. तर यावेळी भावांचे वडिल  फरार होण्यात यशस्वी झाला आहे.

नईम खलील मोमीन (३३) नदीम उर्फ आयबा खलील मोमीन (२५) कलीम खलील मोमीन (२६) ,वसीम खलील मोमीन (२८ सर्व राहणार ,जैतूनपूरा ) असे अटक केलेल्या भावांची नांवे आहेत तर या भावांचे वडिल खलील उर्फ सरदार उर्फ ताजीयावाले मोहम्मद बशीर मोमीन (६३) हा फरार होण्यात यशस्वी झाला आहे. पोलीस कारवाई झालेल्या  या मोमीन बंधूंची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून त्यांनी संगनमताने राहत्या घरात दुकान व खानावळ (भिसी ) उघडून त्याद्वारे नशेच्या गोळ्या व घातक शस्त्रे विक्री करीत होते. त्यामुळे जैतुनपूरा भागात या सर्वांची दहशत पसरली होती. या दहशतीमधून नागरिकांची मुक्तता व्हावी यासाठी स्थानिकांनी शहर पोलीस ठाण्यात लेखी तक्रारी दाखल केल्या होत्या.

दरम्यान, नागरिकांच्या तक्रारीची गंभीर दखल घेत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला एपीआय रोहिणी सोनार, पोलीस उपनिरीक्षक शरद बरकडे आदींच्या पोलीस पथकाने सायंकाळी छापा टाकला असता घटनास्थळी ५ हजार किंमतीचे  गावठी पिस्तूल, ५०० रुपये किंमतीचे जिवंत काडतूसपाच सुरे, २ सूरी, एक तलवार आदी घातक शस्त्रे आणि ४ हजार ५५० रुपये किंमतीच्या नशेच्या गोळ्या व गुटखा तसेच ७४ हजार रुपयांची रोकड आदी मुद्देमाल आढळून आल्याने ते जप्त करण्यात आले  आहे.  अटक आरोपींना मंगळवारी भिवंडी न्यायालयात हजर केले असता त्यांना २० मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर आरोपी नदीम याची प्रकृती बिघडल्याने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावल्याने त्याची रवानगी तळोजा कारागृहात करण्यात आली आहे.

I’m protected online with Avast Free Antivirus. Get it here — it’s free forever.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.