ETV Bharat / state

भिवंडी इमारत दुर्घटना : १० तास ढिगाऱ्याखाली अडकून डोळ्यांनी पाहिला मृत्यू, मात्र...

भिवंडी इमारत दुर्घटनेतील खालिद नावाच्या व्यक्तीला तब्बल १० तासानंतर ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले. माझ्यासाठी बचाव पथक देवासारखे धावून आल्याची प्रतिक्रिया खालिदने दिली. उपचार घेऊन आल्यानंतर त्याने एनडीआरएफ, टीडीआरएफ पथकांचे आभार व्यक्त केले.

ठाणे
ठाणे
author img

By

Published : Sep 24, 2020, 5:32 PM IST

Updated : Sep 24, 2020, 6:32 PM IST

ठाणे - आता काय जगतोय.. असेच म्हणण्यासारखी ती भयाणक, काळीकुट्ट परिस्थिती... मात्र कोणीतरी आपल्याला यातून बाहेर काढेल, या आशेवर तब्बल दहा तास मृत्यूशी अक्षरश: झुंझ दिली. बचाव पथकाच्या जवानांनीही प्रयत्नांची पराकाष्ठा करत खालिद खान नावाच्या व्यक्तीला कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखालून सुखरूप बाहेर काढले. भिवंडीतील इमारत दुर्घटनेतील हा थरार आहे.

भिवंडी इमारत दुर्घटना

ढिगाऱ्याखाली सुमारे १० तास अडकून पडलेल्या या व्यक्तीकडे केवळ एक लिटर पाण्याची बाटली आणि मोबाईल होता. त्याला काही वेळ आपण आता वाचू शकत नाही, असेही वाटत होते. यामुळे त्याने ढिगाऱ्याखालीच मोबाईलवर दुर्घटनेत घडलेला थरार व मुलांनो आईला त्रास देऊन नका, असा व्हिडिओ तयार केला. यावेळात त्याने अनेकांशी मोबाइलवरून संपर्क साधण्याच्या प्रयत्न केला. पण, नेटवर्क मिळत नव्हते. मात्र, नशीब बलवत्तर म्हणून बचाव पथकाने त्याचा आवाज ऐकून १० तासानंतर ढिगाऱ्यातून बाहेर काढले. उघड्या डोळ्याने मी मृत्यू पाहिला, पण खुदाने माझ्यासाठी बंदे पाठवून मला वाचवले, असे खालिद म्हणाला. दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या पहिल्या मजल्यावर खालिद कुटुंबासह राहत आहे.

हेही वाचा - ईटीव्ही भारत विशेष : भिवंडी अग्निशमन दलाच्या जांबाजांमुळे ढिगाऱ्याखाली अडकलेल्या ८ जणांना जीवनदान

त्याचा भाऊ याच दुर्घटनाग्रस्त इमारतीमध्ये दुसऱ्या मजल्यावर राहत होता. या जिलानी इमारतीमध्ये त्यांच्या तीन सदनिका होत्या. खालिदचे भिवंडीतील धामणकर नाका परिरात मोबाईल विक्रीचे दुकान आहे. लॉकडाऊन असल्याने गेल्या काही महिन्यांपासून व्यवसाय बंद होता. त्यामुळे पत्नी व मुलांना मूळ गावी पाठवून तो एकटाच घरात राहत होता. तिसऱ्या मजल्यावर आई-वडील आणि बहीण राहत होती. यांनाही बचाव पथकाने सुखरूप बाहेर काढले आहे. मात्र, दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या भावाचे संपूर्ण कुटूंब या दुर्घटनेत बळी गेल्याने त्याला मोठा धक्का बसला आहे.

दरम्यान, उपचार घेऊन आल्यानंतर त्याने एनडीआरएफ, टीडीआरएफ पथकांचे आभार व्यक्त केले. त्यांच्यासोबत काही काळ ढिगारा उपसण्याचे कामही त्याने केले. माझ्यासाठी बचाव पथक देवासारखे धावून आल्याची प्रतिक्रियाही खालिदने दिली.

हेही वाचा - एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण; घरीच उपचार सुरू

Last Updated : Sep 24, 2020, 6:32 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.