ETV Bharat / state

आचारसंहिता भंगप्रकरणी भिवंडीत भाजप पदाधिकाऱ्याला अटक, उमेदवारालाही बजावली नोटीस

भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांनी उत्तर भारतीय मतदारांना २९ एप्रिलला मतदान करुनच आपल्या गावी जावे, असे आवाहन केले होते. एवढेच नाही तर मतदारांना गावी जाण्यासाठी मी तिकिटे काढून देईन असे वक्तव्यही केले होते.

पंकज गायकवाड
author img

By

Published : Apr 28, 2019, 4:27 AM IST

Updated : Apr 28, 2019, 6:25 AM IST

ठाणे - भिवंडीत परवानगी न घेता सभेचे आयोजन केल्याप्रकरणी भाजप पदाधिकारी सचिन जोगी यांना पोलिसांनी अटक केली आहे. तर त्याच सभेत मतदारांना प्रलोभने दाखवून आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी भाजप उमेदवार कपिल पाटील यांनाही ४८ तासात खुलासा देण्याची नोटीस निवडणूक आयोगाने बजावली आहे. या प्रकारामुळे भाजपच्या गोटात खळबळ माजली आहे.

भिवंडी शहरातील ताडाळी येथील एका मोकळ्या मैदानावर २९ मार्च रोजी भाजपचे पदाधिकारी सचिन जोगी यांनी सभेचे आयोजन केले होते. त्यावेळी भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांनी मोबाईलच्या माध्यमातून उत्तर भारतीय मतदारांना २९ एप्रिलला मतदान करुनच आपल्या गावी जावे असे आवाहन केले होते. एवढेच नाही तर मतदारांना गावी जाण्यासाठी मी तिकिटे काढून देईन असे वक्तव्यही केले होते. सदरचा व्हिडीओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. काँग्रेस पक्षाचे जिल्हा पदाधिकारी पंकज गायकवाड यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे पाटील यांच्याविरुद्ध मतदारांना प्रलोभने दाखवून आचारसंहितेचा भंग करत असल्याची तक्रार दाखल केली होती.

काँग्रेसचे पदाधिकारी पंकज गायकवाड

याबाबत निवडणूक अधिकाऱ्यांनी पोलिसांना चौकशीचे आदेश दिले. पोलिसांनी स्थानिक नागरिकांजवळ या प्रकरणाची चौकशी केली असता असा कोणताच प्रकार घडला नसल्याचे नागरिकांनी सांगितले. मात्र, त्यानंतर एका वृत्तवाहिनीने याबाबची बातमी प्रसारित केल्यानंतर गायकवाड यांनी ठाणे पोलीस अधीक्षकांकडे याबाबत तक्रार दाखल केली आणि संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली. त्यांनतर २९ मार्चला जी सभा घेण्यात आली त्या सभेसाठी कोणतीच परवानगी घेण्यात आली नसल्याचे पोलीस तपासात उघड झाले. याप्रकरणी पोलिसांनी सभा आयोजक जोगी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे. मात्र, न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे.

दरम्यान, भाजप उमेदवार कपिल पाटील यांना निवडणूक निर्णय अधिकारी यांनी २५ एप्रिल रोजी नोटीस पाठवून आपले म्हणणे ४८ तासात मांडण्याचे आदेश दिले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या मुदतीत भाजप उमेदवार पाटील यांनी कोणतेही उत्तर दिले नाही. पाटील यांनी ज्या पद्धतीने प्रलोभन दाखवत आचारसंहितेचा भंग केला त्यावरुन त्यांची उमेदवारी रद्द करण्यात यावी, अशी मागणी आपण करणार आहोत. तसेच याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयापर्यंत आपण लढा देण्यास तयार आहोत, अशी प्रतिक्रिया तक्रारदार पंकज गायकवाड यांनी ‘ईटीव्ही भारत’शी बोलताना दिली.

आचारसंहिता भंग प्रकरणी भिवंडीत भाजप पदाधिकाऱ्याला अटक; तर भाजप उमेदवाराला बजावली नोटीस

ठाणे:- निवडणूका निकोप वातावरणात कोणत्याही प्रलोभनाशिवाय पार पाडाव्यात यासाठी आदर्श आचारसंहितेचे पालन राजकीय पक्ष , उमेदवार , व सर्वसामान्य नागरिक यांनी करणे गरजेचे असताना भिवंडी लोकसभेतील भाजपाचे उमेदवार  खासदार कपिल पाटील यांनी परवानगी न घेता आयोजित केलेल्या सभेत मतदारांना प्रलोभन दाखविल्या प्रकरणी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी संपूर्ण घटनेची चौकशी पोलीस यंत्रणेकडून करवून घेत,  या सभेचे आयोजन करणाऱ्या भाजपा पदाधिकाऱ्याला नारपोली पोलिसांनी गुन्हा दाखल करीत अटक केली. तर भाजप उमेदवार कपिल पाटील याना अट्ठेचाळीस तासात खुलासा देण्याची नोटीस बजाविल्याने भाजपा गोटात खळबळ माजली आहे. 

 भिवंडी शहरातील ताडाळी येथील एका मोकळ्या मैदानावर २९ मार्च रोजी उत्तरभारतीय कार्यकर्त्यांची सभा स्थानिक भाजप पदाधिकारी सचिन प्रकाश जोगी याने आयोजित केली होती. त्या सभेस स्थानिक भाजप गटनेता निलेश चौधरी , नगरसेवक हनुमान चौधरी हे उपस्थित असताना भाजप उमेदवार कपिल पाटील यांनी निलेश चौधरी यांच्या मोबाईल वरून मतदारांशी संवाद साधताना आपण २९ एप्रिल रोजी मतदान करून मगच उत्तर भारतातील आपल्या गावी जावे, मी सर्वाना तिकिटे काढून देईन असे वक्तव्य केले. सदरचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असता काँग्रेस पक्षाचे जिल्हा पदाधिकारी पंकज गायकवाड यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे उमेदवार कपिल पाटील यांनी मतदारांना प्रलोभन दाखवून आदर्श आचारसंहितेचा भंग केल्या बाबत तक्रार केली होती.

याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी यांनी पोलीस विभागास चौकशी करून अहवाल देण्यास सांगितले असता स्थानिक नारपोली पोलिसांनी परिसरातील नागरिकांचे जाबजबाब नोंदविले. मात्र असा प्रकार घडलंच नसल्याचे सांगितले, परंतु त्यानंतर एका युट्युब वृत्तवाहिनिने हि बातमी प्रसारित केल्यावर पंकज गायकवाड यांनी ठाणे पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार दाखल करून गुन्हा नोंदविण्याची मागणी केली. या तक्रारीवरून पोलीस तपासादरम्यान सभा झाली असून त्या सभेला कोणत्याही परवानगी घेतली नसल्याचे पोलीस तपासात उघड झाले. शिवाय पोलिसांनी  अहवालात नमूद करीत तो निर्णय अधिकारी याना सादर केला. यावरून  सभा आयोजक सचिन जोगी याविरोधात पोलिसांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 अंतर्गत कलम  37[1] [3],135 नुसार गुन्हा दाखल करीत त्यास अटक केली असून न्यायालयाने त्यास जामीन दिला आहे.

दरम्यान भाजप उमेदवार कपिल पाटील यांना निवडणूक निर्णय अधिकारी यांनी २५ एप्रिल रोजी नोटीस पाठवून या बाबत आपले म्हणणे अट्ठेचाळीस तासात मांडण्याचे आदेश दिले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या मुदतीत भाजप उमेदवार कपिल पाटील यांनी कोणतेही उत्तर दिले नसल्याची माहिती मिळत आहे. लोकशाही मधील निवडणूक प्रक्रिया निकोप वातावरतां पार पाडाव्यात या साठीच आदर्श आचारसंहिता राबविली जात असून कपिल पाटील ज्या पद्धतीने प्रलोभन दाखवीत आहेत. त्याने आचारसंहिता भंग होत असून त्यांची उमेदवारी रद्द करण्यात यावी. अशी मागणी आपण करणार आपली असून त्यासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत आपण लढा देण्यास तयार आहोत अशी  प्रतिक्रिया तक्रारदार पंकज गायकवाड यांनी  ‘ई टीव्ही भारत’शी बोलताना दिली.

 सर, व्हीजवल , बाईट मोजो वर अपलोड झाले आहे. (slug – bhiwandi loksbha )

I’m protected online with Avast Free Antivirus. Get it here — it’s free forever.
Last Updated : Apr 28, 2019, 6:25 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.