ETV Bharat / state

ठाणे : होम क्वारंटाईन बंद; रुग्ण वाढल्यास बेडची व्यवस्था प्रशासन करणार - आरोग्य विभाग - will increase bed thane mnc news

कोरोनाची दुसरी लाट आता ओसरू लागली आहे. मात्र, या लाटेमध्ये रुग्णांना मागील महिन्यात बेड मिळणेदेखील कठीण झाले होते. मात्र, एकीकडे ठाणे जिल्ह्यातील रुग्णसंख्या झपाट्याने वाढत ती आता कमी होऊ लागली आहे. दरम्यान, संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील एकूण होम क्वारंटाईन रुग्णांची संख्या 64 लाख 26 हजार 445 इतकी आहे.

thane corona
ठाणे कोरोना
author img

By

Published : May 28, 2021, 2:01 PM IST

ठाणे - राज्यात कोरोना रुग्ण कमी झाले आहेत तरीदेखील बेडचा तुटवडा जाणवत आहे. त्यातच राज्य शासनाच्या वतीने ठाणे जिल्ह्यासह १८ जिल्ह्यात होम आयसोलेशन बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, ठाणे जिल्ह्याची परिस्थिती पाहता याठिकाणी मागील वेळी सर्वाधिक रुग्ण कोरोनाबाधित झाले होते तेव्हा ठाण्यातील रुग्णालयात बेड मिळणेदेखील मुश्किल झाले होते. ठाणे जिल्ह्यातील महापालिका आणि प्रशासनाची बेडची जुळवा जुळव सुरुच आहे. असे असताना आता होम आयसोलेशन बंद करण्यात आल्याने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत रुग्ण संख्या अचानक वाढल्यास काय करायचे? असा पेच आतापासून सतावू लागला आहे. त्यासोबत जिल्हा प्रशासन आता राज्य सरकारच्या आदेशाच्या पालनासाठी तयार होत आहे.

याबाबत बोलताना जिल्हा शल्यचिकित्सक

कोरोनाची दुसरी लाट आता ओसरू लागली आहे. मात्र, या लाटेमध्ये रुग्णांना मागील महिन्यात बेड मिळणेदेखील कठीण झाले होते. मात्र, एकीकडे ठाणे जिल्ह्यातील रुग्णसंख्या झपाट्याने वाढत ती आता कमी होऊ लागली आहे. दरम्यान, संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील एकूण होम क्वारंटाईन रुग्णांची संख्या 64 लाख 26 हजार 445 इतकी आहे. त्यापैकी पाच लाख 11 हजार 896 इतके रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यापैकी आता 1953 जण ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. तर 9001 लोकांना आपला प्राण गमवावा लागला आहे. या कोरोना बाधित रुग्णांसाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी प्रशासन तयार आहे.

Statistics released by the administration
प्रशासनाने जाहीर केलेली आकडेवारी

ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत 37 लाख 48 हजार 199 रुग्ण विलगीकरणात आहेत. त्यापैकी 12 हजार 903 हे त्यांच्या स्वतःच्या घरीच विलगीकरणात आहेत. 16 लाख 20 हजार 835 जणांची चाचणी करण्यात आली आहे. त्यापैकी 12 लाख 81 हजार लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 1898 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या 1791 अ‌ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत नऊ लाख 50 हजार 501 नागरिकांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी 97 हजार 476 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. तर 15609 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 18 लाख 16 हजार 151 नागरिक विलगीकरण कक्षात आहेत. त्यापैकी 87 हजार 987 बाधित रुग्ण स्वतःच्या घरी विलगीकरणात आहेत. सध्या 1771 रुग्ण अ‌ॅक्टिव्ह आहेत.

हेही वाचा - ठाणे मनपा : सत्ताधारी शिवसेनेकडून मुस्कटदाबीचा आरोप; विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी घेतली आयुक्तांची भेट

कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीत सात लाख 44 हजार 70 लोकांची चाचणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 32 हजार आठ रुग्ण कोरोना बाधित आहेत. 56 हजार 763 रुग्णांना गृह विलगीकरणात आहेत. त्यापैकी 19 हजार 247 जण स्वतःच्या घरीच विलगीकरणात आहेत. सध्या 2740 रुग्ण अ‌ॅक्टिव्ह आहेत.

मीरा भाईंदर महानगरपालिका, भिवंडी निजामपूर महानगरपालिका, उल्हासनगर महापालिका, या महानगरपालिकेच्या हद्दीत एकूण पाच लाख 37 हजार 500 रुग्ण पॉझिटिव्ह आहेत. त्यापैकी एक लाख 30 हजार 212 रुग्ण विलगीकरण कक्षात आहेत. तीन हजार 629 रुग्ण स्वतःच्या घरी विलगीकरणात आहेत. आतापर्यंत 2148 लोकांना कोरोनामुळे आपला प्राण गमवावा लागला आहे. तर सध्या 1679 रुग्ण अ‌ॅक्टिव्ह आहेत.

अंबरनाथ महानगरपालिका आणि कुळगाव-बदलापूर महानगरपालिकेच्या हद्दीत एक लाख 32 हजार 340 जणांची तपासणी करण्यात आली आहे. 39 हजार 570 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. त्यापैकी दोन लाख 43 हजार 94 रुग्ण रुग्ण विलगीकरण कक्षात आहेत. तर त्यापैकी 38 हजार 249 रुग्ण स्वतःच्या घरीच विलगीकरण झाले आहेत. तसेच 664 रुग्णांचा मृत्यू झाला असून 888 अ‌ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

कल्याण ग्रामीण, भिवंडी ग्रामीण, अंबरनाथ ग्रामीण, शहापूर, मुरबाड, या हद्दीत 66 हजार 32 लोकांची चाचणी केली आहे. यात 35 हजार 866 लोक पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. चार लाख 37 हजार 320 रुग्ण ग्रह विलगीकरण कक्षात आहे. तर त्यापैकी स्वतःच्या घरी विलगीकरणात 58 हजार 476 आहेत. 852 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 1973 अ‌ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

प्रशासन सज्ज -

या कोरोनाच्या काळात रुग्णालयात बेड शिल्लक नसल्याने रुग्णांना आणि रुग्णांच्या नातेवाईकांना बेड मिळण्यासाठी अथक प्रयत्न सुरू असल्याचे दिसून आले आहेत. मात्र, आता जिल्हा प्रशासनाने शाळा हॉल हे ताब्यात घेऊन येणाऱ्या तिसऱ्या लाटेसाठी तयारी केली आहे.

हेही वाचा - ठाणे : पेट्रोल दरवाढीवरुन राष्ट्रवादीची मोदींवर टीका; म्हणाले, 'अच्छे दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.