ETV Bharat / state

ईव्हीएमचा विरोध करत सामाजिक कार्यकर्त्याने फेकली मशीनवर शाई - ठाणे इलेक्शन बातम्या

सुनील खांबे हे ठाणे विधानसभा मतदारसंघातील सिव्हिल हॉस्पिटलच्या बाजूला असलेल्या मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी गेले होते. मतदानानंतर त्यांनी त्यांच्याजवळ असलेली शाईची बॉटल काढून ती ईव्हीएम मशीनवर फेकली. त्यानंतर खाम्बेनी मतदान केंद्रामध्येच इव्हीएम मशीनच्या विरोधात घोषणाबाजी करायला सुरुवात केली, याप्रकरणी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.

बहुजन नेत्याने फेकली इव्हीएम मशीनवर शाई
author img

By

Published : Oct 21, 2019, 6:17 PM IST

ठाणे - जिल्ह्यातील ठाणे शहर मतदारसंघातील एका मतदान केंद्रात येथे असलेल्या ईव्हीएम मशीनवर शाई फेकण्याचा प्रकार घडला आहे. यामुळे या मतदान केंद्रावरील मतदान प्रक्रिया जवळपास 20 ते 25 मिनिटे थांबवावी लागली. ठाण्यातील सामाजिक कार्यकर्ते असलेले सुनील खांबे यांनी हा प्रकार केला असून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.

thane
बहुजन नेत्याने फेकली इव्हीएम मशीनवर शाई

सुनील खांबे हे ठाणे विधानसभा मतदारसंघातील सिव्हिल हॉस्पिटलच्या बाजूला असलेल्या मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी गेले होते. मतदान झाल्यानंतर ते मतदान केंद्राच्या बाहेर न पडता, त्यांनी त्यांच्याजवळ असलेल्या बॉटलीतील शाई ईव्हीएम मशीनवर फेकली. त्यामुळे मतदान केंद्रामध्ये आणि मशीनवर देखील ही शाई पडली. शाई फेकून त्यांनी मतदान केंद्रामध्येच ईव्हीएम मशीनच्या विरोधात घोषणाबाजी करायला सुरुवात केली. अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून त्यांना मतदार केंद्राच्या बाहेर काढले. मात्र, हा गोंधळ 15 ते 20 मिनिटे सुरू असल्याने 20 मिनिटे या मतदान केंद्रावरील मतदान प्रक्रिया थांबली होती.

इव्हीएमचा विरोध करत बहुजन नेते सुनील खांबेनी फेकली मशीनवर शाई

हेही वाचा - भिवंडीत दिग्गजांनी बजावला मतदानाचा हक्क

या प्रकरणानंतर मतदान पुन्हा सुरू करण्यात आले. ईव्हीएम मशीन लोकशाहीसाठी घातक असून ही मशीन बंद करण्यात यावी अशी मागणी खांबे यांनी केली आहे. या प्रकरणी खांबे यांना ठाणे नगर पोलिसांनी ताब्यात घेतले असून मतदान केंद्रावरील अधिकारी यांच्या सुनावनीनुसार खांबेवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

हेही वाचा - सखी मतदान केंद्रावरील स्वागताने भारावल्या मतदार डिसूजा; म्हणाल्या, इतर महिलांनाही देणार प्रोत्साहन

Intro:इव्हीएमचा विरोध करत बहुजन नेत्याने फेकली मशीन वर शाई सुनील खाम्बे पोलिसांच्या ताब्यातBody:

ठाणे शहर मतदार संघातील एका मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीनवर शाई फेकण्याचा प्रकार  घडला असून यामुळे या मतदान केंद्रावरील मतदान प्रक्रिया जवळपास 20 ते 25 मिनिटे थांबावावी लागली आहे   . ठाण्यातील बहुजन नेते असलेले सुनील खांबे यांनी हा प्रकार केला असून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे . सुनील खांबे हे ठाणे विधानसभा मतदार संघातील सिव्हिल हॉस्पिटलच्या बाजूला असलेल्या मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी गेले . मतदान झाल्यानंतर ते थेट मतदान केंद्राच्या बाहेर न पडता त्यांच्याजवळ असलेली शाईची बॉटल काढून ती थेट त्यांनी ईव्हीएम मशीनवर फेकली .त्यामुळे मतदान केंद्रामध्ये आणि मशीनवर देखील ही शाई पडली .शाई फेकून त्यांनी मतदान केंद्रामध्येच इव्हीएम मशीनच्या विरोधात घोषणाबाजी करायला सुरुवात केली . अखेर पोलिसांनी बाळाचा वापर करून त्यांना मतदार केंद्राच्या बाहेर काढले. मात्र हा गोंधळ 15 ते 20 मिनिटे सुरू असल्याने 20 मिनिटे या मतदान केंद्रावरील मतदान प्रक्रिया थांबली होती . त्यानंतर पुन्हा मतदान सुरू करण्यात आले . ईव्हीएम मशीन लोकशाही साठी घातक असून ही मशीन बंद करण्यात यावी अशी मागणी खांबे यांनी केली आहे . खांबे याना ठाणे नगर पोलिसांनी ताब्यात घेतले असून मतदान केंद्रावरील अधिकारी यांच्या सुनानेनुसार गुन्हा दाखल करण्यात येणार आहे .Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.