ठाणे : बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री महाराज गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत आहेत. मीरा भाईंदर येथे धीरेंद्र शास्त्री महाराज यांचा दोन दिवसीय दिव्य दर्शन दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर आज धीरेंद्र शास्त्री यांनी पत्रकार परिषदेत मोठे वक्तव्य केले. आहे. ते म्हणाले की, राजकीय नेते काही विधान करतात. पण मी त्यावर बोलणार नाही. मलाही काही लोक जादू टोणा करणारा बोलतात, पण आम्ही हनुमान भक्त आहोत. महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे. म्हणून महाराष्ट्रापासून हिंदु राष्ट्राचे स्वप्न पूर्ण होणार आहे, असे ते म्हणाले आहेत. ते भिवंडी तालुक्यातील अंजुरदिवे येथील इंडियन कॉर्पोरेशन माईलस्टोन येथे आज दुपारी भूमिपूजनाचा कार्यक्रम आले होते. यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांसोबत संवाद साधला.
सनातन धर्माचा झेंडा रोवणार : भाईंदर येथील झालेल्या कार्यक्रमादरम्यान मायानगरी मुंबईचे माधव नगरी बाबत भाष्य केले होते. त्यावर बोलताना ते म्हणाले की, मायनगरी ही चमक चंदेरी दुनिया आहे. या मायानगरीत लोक अडकली आहे. आता हीच लोकं त्यामधून बाहेर येऊन ती देवाच्या भक्तीत लिन होत आहे. मुंबईतील व्यवस्था पाहून लोकांनी मायानगरी सोडून माधवच्या मागेही धावावे यासाठी महानगरी मुंबईची नाव माधव नगरी केले आहे. भारतातील काही लोक सनातन धर्मातील साधू संतांना कायम विरोध करतात. त्या विरोध करणाऱ्या लोकांच्या छातीवर एक दिवस सनातन धर्माचा झेंडा रोवणार, असल्याचेही त्यांनी सांगितले.
धीरेद्र शास्त्रींनी केले भूमिपूजन : जिल्ह्यातील उद्योगपती रुद्र प्रताप त्रिपाठी यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. विशेष म्हणजे यापूर्वी 6 व 7 नोव्हेंबर 2022 रोजी बागेश्वर धामकडून भिवंडीत दिव्य दर्शन दरबार भरविण्यात आला होता. त्यावेळी उद्योगपती रुद्र प्रताप त्रिपाठी यांनी इंडियन कॉर्पोरेशन माईल स्टोन येथे बागेश्वर धामचे मंदिर व आश्रम उभारण्याचा संकल्प केला होता. आज भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. दरम्यान, भिवंडी तालुक्यात बागेश्वर धाम बालाजी मंदिर व आश्रम भूमिपूजन सोहळा बालाजी सरकार धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या हस्ते अंजुरदिवे येथील गोदाम पट्ट्यात असलेल्या इंडियन कॉर्पोरेशन येथे पार पडला. यावेळी आमदार रवि राणा व खासदार मनोज तिवारी देखील उपस्थित होते.