ETV Bharat / state

पुरीभाजी देण्याच्या बहाण्याने रिक्षा चालकाकडून चिमुरडीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न - police

एका नराधम रिक्षाचालकाने 9 वर्षीय चिमुरडीला पुरीभाजी घेऊन देण्याचे आमिष दाखवून तिच्यावर रिक्षातच लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी घडली. या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस नराधम रिक्षा चालकाचा शोध घेत आहेत.

विठ्ठलवाडी पोलीस ठाणे
विठ्ठलवाडी पोलीस ठाणे
author img

By

Published : Jan 1, 2020, 8:31 AM IST

ठाणे - एका नराधम रिक्षाचालकाने 9 वर्षीय चिमुरडीला पुरीभाजी घेऊन देण्याचे आमिष दाखून तिचावर रिक्षातच लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि. 31 डिसे.) समोर आली आहे. या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होताच पोलिसांनी त्या रिक्षा चालकाचा शोध सुरू केला आहे. भरदिवसा हा प्रकार रहदारीच्या रस्त्यावर घडल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.

कर्जत परिसरात राहणारी महिला उल्हासनगरातील एका उड्डाण पुलाशेजारी आपल्या 3 लहान मुलांसोबत राहते. उदरनिर्वाह करण्यासाठी रस्त्याच्या कडेला चष्मा विक्रीचा व्यवसाय गेल्या अनेक वर्षापासून ती करते. उल्हासनगर कॅम्प क्र. 4 परिसरात ती चष्माच्या व्यवसाय ज्या ठिकाणी करते त्या ठिकाणी रिक्षा थांबा आहे. यामुळे या रिक्षा थांब्यावरील त्या महिलेच्या ओळखीचा असलेला एक रिक्षाचालक महिलेच्या लहान मुलांना ओळखत असल्याने पीडित मुलीला मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास भूक लागल्याने त्या पीडित मुलीला पुरीभाजी हॉटेलमधून आणायची होती. त्यावेळी रिक्षा रांगेमध्ये घेऊन उभा असलेल्या रिक्षाचालकाने पीडित मुलीला आपल्या रिक्षात बसवून तिला पुरीभाजी आणण्यासाठी घेऊन गेला.

त्यावेळी वाटेत रिक्षा थांबवून रिक्षातच पीडित मुलीसोबत लैंगिक चाळे करू लागला. यामुळे भयभीत झालेल्या पीडित मुलीने त्या रिक्षातून पळ काढत आपल्या आईकडे धाव घेत, रिक्षात घडलेला घृणास्पद प्रकार सांगितला. त्या महिलेने रिक्षाचालकाचा शोध घेऊन त्याला पकडून या घटनेचा जाब विचारत, त्याला चपलीने झोडपले. त्यानंतर नागरिकांच्या मदतीने पोलीस ठाण्यात घेऊन जाणार तितक्यात नराधम रिक्षाचालकाने रिक्षासह पलायन केले.

हेही वाचा - नोकराने फसवले मालकाला, परस्पर २ कोटींचा माल केला लंपास

त्यांनतर भयभीत झालेल्या पीडित मुलीला त्या महिलेने शांत केल्यावर या घटनेबाबत पोलीस ठाण्यात रितसर तक्रार करण्यासाठी धाव घेतली. मात्र, महिलेची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे ती तक्रार करण्यास घाबरत होती. दरम्यान, या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला असला. तर आम्ही आरोपी रिक्षा चालकाचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाई करणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे यांनी सांगितले.

हेही वाचा - ठाणेकरांची मासुंदा तलावावर गर्दी, नववर्षाचे जल्लोषात स्वागत

Intro:kit 319Body: पुरीभाजी देण्याच्या बहाण्याने चालकाकडून ९ वर्षीय चिमुरडीवर रिक्षातच लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न

ठाणे : एका नराधम रिक्षाचालकाने ९ वर्षीय चिमुरडीला पुरीभाजी घेऊन देण्याचे आमिष दाखून तिचावर रिक्षातच लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होताच पोलिसांनी त्या रिक्षाचालकाचा शोध सुरु केला आहे. भरदिवसा हा प्रकार रहदारीच्या रस्त्यावर घडल्याने महिला वर्गांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.
कर्जत परिसरात राहणारी महिला उल्हासनगरातील एका उड्डाण पुला शेजारी आपल्या ३ लहान मुलांना सोबत घेऊन ती आपला उदरनिर्वाह करण्याससाठी रस्त्याच्या कडेला चष्मा विक्रीचा व्यवसाय गेल्या अनेक वर्षापासून करते. उल्हासनगर कॅम्प ४ नंबर परिसरात ती चष्माच्या व्यवसाय ज्या ठिकाणी करते त्या ठिकाणी रिक्षा थांबा आहे. यामुळे या रिक्षा थांब्यावरील त्या महिलेच्या ओळखीचा असलेला एक रिक्षाचालक महिलेच्या लहान मुलांना ओळखत असल्याने पीडित मुलीला मंगळवारी दुपारी साडे १२ च्या सुमारास भुक लागल्याने त्या पीडित मुलीला पुरीभाजी हॉटेलमधून आणायची होती. त्यावेळी रिक्षा रांगेतमध्ये घेऊन उभा असलेल्या नराधम रिक्षाचालकाने पीडित मुलीला आपल्या रिक्षात बसवून तो तिला पुरीभाजी आणण्यासाठी घेऊन गेला.
त्यावेळी वाटेत त्याने रिक्षा थांबवून त्या रिक्षातच पीडित मुलीसोबत लैंगिक चाळे करू लागला. त्यावेळी रिक्षाचालकाने पीडित मुलीवर अतिप्रसंग करण्यासाठी तिच्या अंगावरील शर्टाचे बटन देखील तोडले. यामुळे भयभीत झालेल्या पीडित मुलीने त्या रिक्षातून पळ काढत आपल्या आईकडे धावून गेली. आणि रिक्षात घडलेला घृणास्पद प्रकार आपल्या आईला सांगताच त्या महिलेने त्या रिक्षाचालकाचा शोध घेऊन त्याला पकडून या घटनेचा जाब विचारत त्याला चपलीने झोडपले. त्यानंतर नागरीकांच्या मदतीने पोलिस ठाण्यात घेऊन जाणार तितक्यात नराधम रिक्षाचालकाने रिक्षा वेगाने घेऊन त्या ठिकाणाहून पलायन केले. त्यांनतर भयभीत झालेल्या पीडित मुलीला त्या महिलेने शांत केल्यावर या घटनेबाबत पोलिस ठाण्यात तक्रार करण्यासाठी धाव घेतली. मात्र महिलेची आर्थिक परिस्थिती हलाख्याची असल्यामुळे ती तक्रार करण्यास घाबरत होती.
दरम्यान, या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला असला. तर आम्ही आरोपी रिक्षाचालकाचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाई करण्यार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे यांनी सांगितले.

Conclusion:viththlvadi
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.