ठाणे (भाईंदर): शक्ती ज्वेलर्समध्ये शनिवारी दुपारी पाचच्या सुमारास एक तरुण काळ्या रंगाची बॅग घेऊन आला. त्याने दुकान मालकाला सोन्याचे बिस्कीट विकायचे आहे असे सांगून दुकानाची रेकी करतो. तो तरुण पुन्हा पाच मिनिटांनी दुकानात आला आणि मालकाला बंदूक दाखवून दुकान लुटण्याचा प्रयत्न केला; मात्र मालकाने न घाबरता स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे.
पाठलाग करून दरोडेखोरास पकडले: दुकान मालक त्याला विरोध करत असल्याचे पाहून हा तरुण पळून गेला; मात्र मालकाने आरडाओरड केल्यानंतर दुकान शेजारी असलेल्या एका मुलाने त्याचा पाठलाग केला आणि पकडले. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत संबंधित तरुणाला ताब्यात घेतले. भाईंदर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्रीमंतीच्या हव्यासापोटी लुटमार: हा दरोडेखोर तरुण भाईंदर पूर्वेला राहायला असून वडील चहा विक्रेते आहेत. ९ वी पास झालेला या तरुणाने मोठा व्यक्ती होण्याचे स्वप्न पाहून हे कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे. आरोपीला शेयर मार्केटचेही चांगले ज्ञान आहे. त्यामुळेच आर्थिकदृष्टया लवकर मोठे झालो पाहिजे या भावनेने त्याने सोन्याचे दुकान लुटण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुगुटराव पाटील यांनी दिली आहे.
बंदुकीच्या धाकावर दरोडा: मीरा भाईंदर रोडच्या शांतीनगर सेक्टर 4मध्ये असलेल्या एस. कुमार गोल्ड अॅण्ड डायमंड्स ज्वेलरी शॉपमध्ये भरदिवसा दरोडा पडला होता. बंदुकीचा धाक दाखवून दरोडेखोरांनी 7 जानेवारी, 2021 रोजी दरोडा टाकला होता. सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली होती.
सोने घेण्याचे केले नाटक: मीरा भाईंदर वसई विरार परिमंडळ-१ चे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी सांगितले होते की, दुपारी दोनच्या सुमारास दोन मोटारसायकलवरून चार जण आले असे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दिसत होते. सोने घेण्याचे नाटक करत या चौघांनी ज्वेलरीच्या दुकानात प्रवेश केला त्यानंतर दरोडा टाकून ते दरोडेखोर पसार झाले होते. पोलिसांनी या सर्व आरोपींना उत्तरप्रदेशमधून अटक करून सर्व मुद्देमाल जप्त केला होता. आता त्यानंतर आजची ही घटना समोर आल्याने सराफ व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
हेही वाचा: Bilpab Kumar Deb On Saibaba Darshan: साईबाबांची महिमा ऐकून शिर्डीत आलो- बिल्पब कुमार देब