मीरा भाईंदर - तिवरांची झाडे असताना शांतीपार्क परिसरातील एक भंगार दुकानदाराने वायरी जाळून मोठ्या प्रमाणावर आग लावल्याने काशीमिरा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. मिरारोड स्थानक ते भक्तीवेदांत रोडवर सृष्टी पोलीस चौकीजवळ ही प्रकार घडला. उदयलाल पटेल (शॉप नंबर 7, शांतीविहार सी-7, शांतीपार्क मिरारोड) असे या भंगार व्यावसायिकाचे नाव आहे.
सातत्याने पोलीस कारवाई...
एकीकडे पालिका, महसूल व पोलीस प्रशासन कांदळवन वाचवा म्हणून सातत्याने सांगत आहे. त्या जागेवर मोठे मोठे बोर्ड लावून लोकांचे लक्ष वेधण्याचे काम करून त्या परिसरात झाडांना इजा पोहोचेल, असे कोणतेही काम करू नका किंवा भरणी तसेच डेब्रिज टाकून पाण्याचे प्रवाह अडवू नका, असे सांगत आहे. तर दुसरीकडे, काही लोक मुद्दाम कांदळवन झाडांना धोका निर्माण होऊ शकेल, असे कृत्य करत असल्याचे समोर येत आहे. अशा कृत्य करणाऱ्यांवर पोलीस सातत्याने कारवाई करत असतात.
हेही वाचा - पत्रीपुलाच्या कामाचे श्रेय केंद्र सरकारचे; इतर पुलांचे काम कधी पूर्ण करणार? भाजपचा सवाल