ETV Bharat / state

दारूसाठी पैसे न दिल्याने जन्मदात्या आईला जीवे मारण्याचा प्रयत्न - विकृत मुलाची आईला मारहाण ठाणे

विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात आज प्रेमलता यांच्या तक्रारीवरून सुमीतविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांनंतर पोलिसांनी आरोपी सुमीतला अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी सुमीतवर तो अल्पवयीन असताना एका हत्येचा आणि हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

आरोपी सुमीत पाटील
author img

By

Published : Nov 23, 2019, 7:16 PM IST

ठाणे - दारू पिण्यासाठी २०० रूपये दिले नाही म्हणून संतापलेल्या मुलाने स्वत:च्या आईला मारहाण करून दोरीने गळा आवळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उल्हासनगर शहर - कॅम्प ४ येथील संतोषनगर परिसरात घडली आहे. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी आरोपी सुमीत पाटील (वय ३१) याला अटक केली आहे.

दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याने जन्मदात्या आईला जीवे मारण्याचा प्रयत्न

प्रेमलता पाटील या घरकाम करून उपजीविका भागवतात. शुक्रवार (22 नोव्हेंबर) रात्री दीडच्या सुमारास त्यांचा मुलगा सुमीत घरी आला. त्याने आईला दारू पिण्यासाठी २०० रूपये मागितले. प्रेमलता यांनी नकार दिल्यानंतर रागाच्या भरात त्याने प्रेमलता यांच्या डाव्या डोळयावर जोरात फटका मारून दोरीने त्यांचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला. प्रेमलता यांनी आरडाओरड केल्यावर शेजारी राहणाऱ्या महिलेने त्यांच्या घरात धाव घेऊन आरोपीच्या तावडीतून त्यांची सुटका केली.

हेही वाचा - माथेफिरु तरुणाचे नातेवाईकांवर कोयत्याने वार; ७ जण गंभीर

विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात आज प्रेमलता यांच्या तक्रारीवरून सुमीत विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांनंतर पोलिसांनी आरोपी सुमीतला अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी सुमीतवर तो अल्पवयीन असताना एका हत्येचा आणि हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. याप्रकरणी अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक सोनवणे करत आहेत.

Intro:kit 319Body:दारूसाठी २०० रुपये देण्यास नकार देणाऱ्या माऊलीला जिवेठार मारण्याचा प्रयत्न : मुलाला अटक

ठाणे : आईने २०० रूपये दारू पिण्यासाठी दिले नाही म्हणून संतापलेल्या विकृत मुलाने आईला मारहाण करून रस्सीने गळा आवळून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळेत शेजाऱ्यांनी धाव घेतल्याने त्या माउलीचे प्राण वाचवले. हि खळबळजनक घटना उल्हासनगर शहरातील कॅम्प नं.४ येथील संतोषनगर परिसरात घडली आहे.

याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे. सुमीत पाटील (३१) असे अटक केलेल्या आरोपी मुलाचे नाव आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी सुमीतवर एक हत्येचा व हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार शहरातील कॅम्प नं.४ येथील संतोषनगर परिसरात श्रीमती प्रेमलता पाटील (४५) ही महिला आपल्या कुटूंबासह राहते. काल रात्री दीडच्या सुमारास तिचा मुलगा सुमीत हा घरी आला. त्याने आई प्रेमलता हिच्याकडे दारू पिण्यासाठी २०० रूपये मागितले. प्रेमलता यांनी त्याला २०० रूपये देण्यास नकार दिल्याने त्याचा राग सुमीतला आला. त्याने आई प्रेमलता हिच्या डाव्या डोळयावर जोरजोरात फटका मारून कपडयाच्या पिळ घातलेल्या रस्सीने आईचा गळा आवळून जिवेठार मारण्याचा तो प्रयत्न करीत होता. त्यावेळी प्रमलता या जोरजोराने ओरडू लागल्याने शेजारी राहणाऱ्या महिलेने त्यांच्या घरात धाव घेऊन तिचे प्राण वाचवत तिच्या मुलाच्या तावडीतून तिची सुटका केली.

या प्रकरणी श्रीमती प्रेमलता हिने दिलेल्या फिर्यादीवरून विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात तिचा मुलगा सुमीत पाटील याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. अधिक तपास स.पो.नि.सोनवणे करीत आहेत.

Conclusion:ulhasnagr
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.