ETV Bharat / state

Fake Facebook Account : महापालिका आयुक्तांच्या नावे बनावट फेसबुक, व्हॉट्सॲप खाते

भिवंडी निजामपूर महापालिका आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांच्या नावाने बनावट फेसबुक, व्हॉट्सअप खाते उघडून अज्ञात व्यक्तीकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न झाला आहे. आयुक्तांनी त्यांच्या व्हाट्स अप स्टेटसला ठेवलेल्या संदेशावरून हे प्रकरण समोर आले आहे. तर याप्रकरणी आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांनी अज्ञात व्यक्तीच्या संदेशांना बळी न पडता नागरिकांनी सर्तक राहण्याचे अवाहन केले आहे.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Jun 16, 2023, 7:51 PM IST

आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांची प्रतिक्रिया

ठाणे : आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांच्या नावाने बनावट फेसबुक, व्हॉट्सअप अकाउंट तयार केले. या बनावट अकाउंटद्वारे पैशांची मागणी केली जात असल्याची माहिती महापालिका आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांनी आपल्या व्हाट्सअप स्टेटसद्वारे दिली आहे. तसेच त्यांनी कोणीही याला बळी पडू नये, असे आवाहन शहरातील नागरिकांना केले आहे. आयुक्तांनी बनावट अकाउंट बनवणाऱ्या अज्ञात व्यक्ती विरोधात सायबर क्राईममध्ये तक्रार देखील केली आहे.

आयुक्त म्हसाळ पुन्हा पदावर : आयुक्त विजयकुमार म्हसाळ भिवंडी महापालिकेचा पदभार गेल्या एक वर्षांपासून सांभाळत असून ते भिवंडी - निजामपूर महापालिकेत कार्यरत आहेत. मात्र, नुकतीच त्यांची शासनामार्फत तडकाफडकी बदली करण्यात आली होती. त्यांच्या जागी पालिका आयुक्त म्हणून अजय वैद्य यांची नियुक्ती राज्य शासनाकडून करण्यात आली होती. याविरोधात आयुक्त म्हसाळ यांनी कॅगमध्ये न्याय मागितला असता कॅगचा निर्णय आयुक्त म्हसाळ यांच्या बाजूने दिला. या घटनेला तीन दिवस उलटून होत नाही तोच आयुक्त म्हसाळ यांच्या नावाने बनावट फेसबुक, व्हॉट्सअप अकाउंट उघडण्यात आले आहे. या घटनेमुळे पालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे. आयुक्तांनी त्यांच्या व्हाट्स अप स्टेटसला ठेवलेल्या संदेशावरून हे प्रकरण समोर आले आहे. तर याप्रकरणी आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांनी अज्ञात व्यक्तीच्या संदेशांना बळी न पडता नागरिकांनी सर्तक राहण्याचे अवाहन केले आहे.

नागरिकांनी ऑनलाईन प्रलोभनांना बळी पडू नये : हॅकर्सकडून सर्व सामान्य व्यक्तीची फसवणूक होऊन सदर व्यक्तीच्या बँक खात्यातुन रक्कम पळवीत असतात. मात्र, आपण काही नियमांचे पालन केल्यास यावर अंकुश बसू शकतो असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे. सोशल मीडियाद्वारे मैत्री करून नंतर गिफ्ट देण्याच्या बहाण्याने लाखोंची फसवणूकही केली जाते. अनेक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून लग्नाच्या आमिषाने त्यांची फसवणूक करण्याचेही प्रकार घडतात. अशा प्रलोभनांना बळी पडू नये, असे, आवाहनही यावेळी नागरिकांना पोलीस अधिकाऱ्याकडून करण्यात आले. तसेच नागरिकांना सामाजीक माध्यमे वापरातांना काळजी घ्यावी असे पोलीस प्रशासनाने निवेदनाद्वारे वारंवार सांगितले आहे.

हेही वाचा - Theft Shilpa Shetty House : अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरात चोरी करणाऱ्यांना अटक, तिहेरी सुरक्षा भेदून 25 फूट भिंतीवर चढून चोरट्यांनी केला घरात प्रवेश

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.