ETV Bharat / state

उल्हासनगर पोलीस ठाण्यासमोरच कुटुंबाचा आत्मदहनाचा प्रयत्न, पोलिसांमुळे अनर्थ टळला - पोलीस ठाण्यासमोरच आत्मदहनाचा प्रयत्न

उल्हासनगर पोलीस ठाण्यासमोर एका कुटुंबाने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडित कुटूंबातील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याचा आरोप या कुटुंबाने केला आहे. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल असल्याचे सांगितले जात आहे.

Attempt of family self-immolation
Attempt of family self-immolation
author img

By

Published : Sep 15, 2021, 8:57 PM IST

Updated : Sep 15, 2021, 9:10 PM IST

ठाणे - उल्हासनगर पोलीस ठाण्यासमोर एका कुटुंबाने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडित कुटूंबातील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याचा आरोप या कुटुंबाने केला आहे. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल असल्याचे सांगितले जात आहे. मात्र अत्याचार करणाऱ्या आरोपींना पोलीस अटक करत नसल्याने या कुटूंबाने टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगण्यात आले.

उल्हासनगर पोलीस ठाण्यासमोरच कुटुंबाचा आत्मदहनाचा प्रयत्न
गुन्हा दाखल होऊन दीड महिना उलटला तरी आरोपींना अटक नाही -

उल्हासनगर एक नंबर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीवर काही महिन्यापूर्वी घरात घुसून अत्याचार केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल आहे. मात्र अत्याचाराचा गुन्हा दाखल असलेल्या आरोपीना अद्याप अटक झालेली नाही. त्यामुळे पीडित कुटूंबियांनी आज पोलीस ठाण्यासमोरच अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी पोलीस ठाण्याबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त असल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला.

हे ही वाचा - राज कुंद्रा प्रकरण : गुन्हे शाखेने दीड हजार पानांचे पुरवणी दोषारोपपत्र केले न्यायालयात सादर

Last Updated : Sep 15, 2021, 9:10 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.