ETV Bharat / state

तहसील कार्यालयावरून उडी मारून शेतकऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी ४ वर्षांनी गुन्हा दाखल, अधिकाऱ्यांचे त्रिकुट फरार - अशोक शंकर देसले

मुरबाड तालुक्यातील अशोक शंकर देसले (६७ वर्षे) या शेतकऱ्याने ४ वर्षापूर्वी मुरबाड तहसील कार्यालयाच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली होती. आता या प्रकरणी राज्य मानवी हक्क आयोगाच्या आदेशानुसार मुरबाड कार्यालयातील तत्कालीन अधिकारी, कर्मचारी व मृत वृद्धाच्या एका नातेवाईकावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र गुन्हा दाखल होऊन पंधरा दिवस उलटूनही अद्यापही आरोपींना अटक करण्यात मुरबाड पोलिसांना यश आले नाही. तत्कालीन तहसीलदार सर्जेराव म्हस्के-पाटील, नायब तहसीलदार अजय पाटील आणि कर्मचारी नितीन घाणेकर असे गुन्हा दाखल झालेल्या अधिकारी-कर्मचाऱ्याची नावे आहेत.

murbad
murbad
author img

By

Published : Jul 18, 2021, 9:11 PM IST

ठाणे - मुरबाड तालुक्यातील ६७ वर्षाच्या वयोवृद्ध शेतकऱ्याने ४ वर्षापूर्वी मुरबाड तहसील कार्यालयाच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली होती. आता या प्रकरणी राज्य मानवी हक्क आयोगाच्या आदेशानुसार मुरबाड कार्यालयातील तत्कालीन अधिकारी, कर्मचारी व मृत वृद्धाच्या एका नातेवाईकावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र गुन्हा दाखल होऊन पंधरा दिवस उलटूनही अद्यापही आरोपींना अटक करण्यात मुरबाड पोलिसांना यश आले नाही. त्यामुळे मृत शेतकऱ्याच्या मुलाने पोलिसांच्या तपासावर संशय व्यक्त केला आहे. तत्कालीन तहसीलदार सर्जेराव म्हस्के-पाटील, नायब तहसीलदार अजय पाटील आणि कर्मचारी नितीन घाणेकर असे गुन्हा दाखल झालेल्या तत्कालीन अधिकारी-कर्मचाऱ्याची नावे आहेत. तर अशोक शंकर देसले (६७ वर्षे) असे तहसील कार्यालयाच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

अंनता देसले - आत्महत्या केलेल्या शंकर देसलेंचा मुलगा

न्यायासाठी वर्षभर तहसील कार्यलयात हेलपाटे

मुरबाड तालुक्यातील शेलगाव येथील मृत शेतकरी अशोक शंकर देसले यांची शेतजमीन त्यांचे चुलत भाऊ नामदेव देसले यांनी खोटी कागदपत्रे तयार करून ४ वर्षांपूर्वी हडप केली होती. त्यामुळे आपली शेतजमीन परत मिळावी यासाठी अशोक देसलेंनी २०१६ साली मुरबाड तहसील कार्यालयात अर्ज दाखल केला होता. त्यानंतर वर्षभर तहसील कार्यालयाच्या पायऱ्याही झिझवल्या. मात्र, वर्षभर न्यायासाठी हेलपाटे मारूनही न्याय मिळाला नाही. त्यामुळे अखेर कंटाळून १० मे २०१७ रोजी अशोक देसले यांनी तहसील कार्यालयाच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवली.

'...तर माझ्या वडिलांवर आत्महत्येची वेळ आली नसती'

'अशोक देसले यांच्या आत्महत्येप्रकरणी जनआंदोलनही करण्यात आले. त्यामुळे मुरबाड महसूल विभागाने आपली चुक सुधारत मृत अशोक देसले यांच्या कुटुंबाला त्यांची शेतजमीन पुन्हा त्यांच्या नावे करून दिली. मात्र, घराचा कर्ता पुरुष गेल्यावर मुजोर महसूल विभागाला जाग आली. हेच जर माझे वडिल हयात असताना वेळीच केले असते, तर माझ्या वडिलांवर आत्महत्येची वेळ आली नसती', असा आरोप अशोक यांचा मुलगा अंनता देसले यांनी केला आहे.

'आरोपींना कठोर शिक्षा व्हावी'

याप्रकरणी जवळपास चार वर्षे राज्य मानवी हक्क आयोगाकडे दावा सुरू आहे. या दाव्याच्या अंतिम सुनावणीत 3 जुलै २०२१ रोजी तत्कालीन मुरबाड महसूल अधिकारी, कर्मचारी व मृत शेतकरी अशोक देसले यांचे चुलत भाऊ नामदेव देसले यांच्यावर मुरबाड पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, आजपर्यंत एकाही आरोपीला अटक करण्यात आली नाही. आतापर्यंत आरोपींना का अटक होत नाही? याबाबत मुरबाड तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. तर लवकरात लवकर संबधित आरोपींना अटक करून कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी मृत शेतकऱ्याचा मुलगा अनंता देसले यांच्यासह तालुक्यातील शेतकऱ्यांकडून होत आहे. याबाबात मुरबाड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोराटे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी या गुन्ह्याचा तपास सुरु असून आतापर्यंत एकही आरोपी ताब्यात नसल्याचे सांगितले आहे.

हेही वाचा - कुत्री सोडल्यासारखी तपास यंत्रणा सोडलीय, पृथ्वीराज चव्हाण यांची केंद्र सरकारवर टीका

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.