ETV Bharat / state

ओवैसींची भिवंडीतील सभा रद्द; भाजपचे दबावतंत्र यशस्वी? - MIM in Bhiwandi

नागरिकत्व कायद्याला विरोध दर्शविण्यासाठी एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांच्या जाहीर सभेचे आयोजन भिवंडीतील टावरे स्टेडियममध्ये करण्यात आले होते. मात्र, दिल्लीतील आंदोलनात हिंसाचार उफाळल्याने भिवंडीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी ही सभा रद्द केली.

asaduddin owaisi rally in bhiwandi
औवेसींची भिवंडीतील सभा रद्द करण्यात आली आहे
author img

By

Published : Feb 28, 2020, 4:30 AM IST

ठाणे - नागरिकत्व कायद्याला विरोध दर्शविण्यासाठी एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांच्या जाहीर सभेचे आयोजन भिवंडीतील टावरे स्टेडियममध्ये करण्यात आले होते. मात्र, दिल्लीतील आंदोलनात हिंसाचार उफाळल्याने भिवंडीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी ही सभा रद्द केली.

औवेसींची भिवंडीतील सभा रद्द करण्यात आली आहे

आता ओवैसींची सभा मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात होणार असल्याचे संकेत एमआयएमने दिले आहेत.

आम्ही सभा उधळून लावू...

या जाहीर सभेला भाजपचा विरोध असून हा कार्यक्रम उधळून लावू, असा इशारा त्यांनी दिला होता. तसेच भिवंडीतील मुख्य नाक्यांवर भाजपचे कार्यकर्ते ओवैसींची नाकाबंदी करणार असल्याची भूमिका भाजपने घेतली. तर, भाजपच्या या विरोधी भूमिकेनंतर एमआयएमचे शहराध्यक्ष खालिद गुड्डू यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी संबधित सभा पूर्वनियोजित असून त्यामध्ये कोणताही बदल होणार नाही असे खडसावले होते. एमआयएमच्या प्रतिआव्हानमुळे भिवंडीचे राजकीय वातावरण चांगलेच तापले. मात्र, पोलिसांनी केलेल्या मनधरणीमुळे तसेच शहरातील शांतता कायम ठेवण्यासाठी औवेसींनी ही सभा रद्द केली.

एकीकडे सीएए, एनआरसी, एनपीआर कायद्याला विरोध करण्यासाठी भिवंडीतील महिलांचे 28 दिवसांपासून शांततेच्या मार्गाने शाहीनबाग आंदोलन सुरू आहे. मात्र, आता दिल्लील आंदोलनात हिंसाचार उफाळल्याने पोलिसांनी खबरदारीचा उपाय घेतला आहे.

यासंबंधी एमआयएमचे शहर महासचिव अॅड.अमोल कांबळे पत्रकार परिषदेत माहिती दिली. मात्र, ही सभा मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात होणार असल्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. पोलिसांनी अचानक आयोजकांना आजच्या सभेसंदर्भात नोटीस बजावून परवानगी नाकारली. यामुळे आयोजकांकडून सभेच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या मंडपसह हजारो खुर्च्या पोलीस बंदोबस्तात पुन्हा काढण्यात आल्या आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.