ETV Bharat / state

मुख्यमंत्री शिंदेंच्या विरोधात फेसबुकवर वादग्रस्त विधान.. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याला पोलिसांकडून अटक

फेसबुकवर मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्याची वादग्रस्त विधान करून पोस्ट व्हायरल करणाऱ्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यावर विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Controversial statement about Chief Minister and Deputy Chief Minister

author img

By

Published : Nov 5, 2022, 5:40 PM IST

ठाणे: फेसबुकवर मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्याची वादग्रस्त विधान करून पोस्ट व्हायरल करणाऱ्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यावर विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शशांक रवींद्र माणगावकर (वय ३९, रा. उमेशनगर, डोंबिवली पश्चिम) असे गुन्हा दाखल झालेल्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याचे नाव असून पोलिसांनी त्याला डोंबिवलीतून अटक केली आहे.

मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्याविषयी वादग्रस्त विधान

वादग्रस्त शेरेबाजी करुन त्यांचीही बदनामी आरोपी शशांक यांनी शुक्रवारी त्यांच्या फेसबुक अकाऊंडवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शेतात काम करत असतानाच्या फोटोवर वादग्रस्त लिखाण करून पोस्ट व्हायरल केली होती. या फोटोच्या खाली केलेल्या लिखाणानंतर ठाकरे- शिंदे गटात द्वेशभावनेचे वातावरण निर्माण झाले आहे. शिवाय आरोपीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विषयीही वादग्रस्त शेरेबाजी करुन त्यांचीही बदनामी केली आहे.

विविध कलमानुसार गुन्हा दाखल ही व्हायरल पोस्ट शिंदे गटाचे डोंबिवलीतील पदाधिकारी संतोष चव्हाण यांच्या लक्षात येताच त्यांनी विष्णुनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ भालेराव यांना व्हायरल पोस्ट दाखवली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी शशांकच्या फेसबुकवरील लिखाणाची खात्री करुन चव्हाण यांच्या तक्रारीवरून राजकीय द्वेशभावना पसरविणे, दोन गटात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याच्या आधारे त्याचा शोध घेऊन त्याला अटक केली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास उपनिरीक्षक घनश्याम बेंद्रे करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.