ETV Bharat / state

'अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची मुंबईतच राहण्याची व्यवस्था करा' - corona update

अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या मुंबईत नोकरीसाठी जाणाऱ्यांमुळे नवी मुंबईच्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येत सुमारे 92 रुग्णांनी वाढ झाली आहे. यामुळे हे प्रमाण रोखण्यासाठी नवी मुंबईत वास्तव्यास असणारे मात्र मुंबईत कार्यरत असणाऱ्या व्यक्तींनी काही कालावधीसाठी कामाच्या ठिकाणीच वास्तव्य करण्याच्या महापालिका आयुक्तांनी सूचना केल्या आहेत. तसेच मुंबईतील रुग्णांवर मुंबईतच उपचार करावेत, अशी मागणी बेलापूर मतदारसंघाच्या आमदार मंदा म्हात्रें यांनी केली आहे.

Navi Mumbai
नवी मुंबईचे आयुक्त आण्णासाहेब मिसाळ
author img

By

Published : Apr 28, 2020, 7:09 PM IST

नवी मुंबई - दिवसेंदिवस नवी मुंबईत कोरोनाचा कहर वाढतच आहे. त्यामुळे सर्वांच्याच चिंतेत भर पडत आहे. गेल्या काही दिवसांपासून अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या मुंबईत नोकरीसाठी जाणाऱ्यांमुळे नवी मुंबईच्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येत सुमारे 92 रुग्णांनी वाढ झाली आहे. यामुळे हे प्रमाण रोखण्यासाठी नवी मुंबईत वास्तव्यास असणारे मात्र मुंबईत कार्यरत असणाऱ्या व्यक्तींनी काही कालावधीसाठी कामाच्या ठिकाणीच वास्तव्य करण्याच्या महापालिका आयुक्तांनी सूचना केल्या आहेत. तसेच मुंबईतील रुग्णांवर मुंबईतच उपचार करावेत, अशी मागणी बेलापूर मतदारसंघाच्या आमदार मंदा म्हात्रें यांनी केली आहे.

अण्णासाहेब मिसाळ, आयुक्त नवी मुंबई महानगरपालिका

आठवडाभरात नवी मुंबईत कोरोनाच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. नवी मुंबईत वास्तव्यास असणारे अनेक लोक अत्यावश्यक सेवेसाठी मुंबईत कार्यरत आहेत. यामध्ये डॉक्टर, नर्स, वार्डबॉय, बेस्ट चालक- वाहक, रुग्णवाहिका चालक, पोलीस कर्मचारी यांचा यात समावेश आहे. आतापर्यंत 15 पेक्षा अधिक मुंबईत नोकरीसाठी जाणाऱ्या व अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या व्यक्तीना कोरोनाची लागण झाली असून, या व्यक्तींच्या संपर्कात आल्याने त्यांच्या संपर्कातील व कुटुंबातील व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. आत्तापर्यंत नवी मुंबईत 145 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून, पैकी 92 रुग्ण मुंबईत अत्यावश्यक सेवेतील नागरिक व त्यांच्या संपर्कातील व्यक्ती आहेत. मुंबईत अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या एका डॉक्टरमुळे त्यांच्या कुटुंबातील 14 व्यक्ती कोरोना संक्रमित झाल्या आहेत.

मंदा म्हात्रें, आमदार बेलापूर मतदारसंघ

नवी मुंबईतील कोरोनाग्रस्तांची संख्या रोखण्यासाठी, ज्या व्यक्ती मुंबईत अत्यावश्यक सेवेत आहेत. व त्यांना मुंबईत कामानिमित्त दररोज जावे लागत आहे, अशांना पुढील काही कालावधीसाठी मुंबई व नवी मुंबईत ये जा करण्यापेक्षा मुंबईतच कामाच्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था करावी. ज्या ठिकाणी ते काम करत आहेत त्या आस्थापनाकडून राहण्याची व्यवस्था करून घ्यावी, अशा सूचना नवी मुंबईचे आयुक्त आण्णासाहेब मिसाळ यांनी केल्या आहेत. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जे मुंबईतील रुग्ण नवी मुंबईत दाखल केले जात आहेत, त्यामुळे नवी मुंबईतील आरोग्य सेवेवर मोठ्या प्रमाणावर ताण पडत आहे. नवी मुंबई व्यतिरिक्त इतर ठिकाणचे रुग्ण नवी मुंबईच्या रूग्णांलयात दाखल करून घेऊ नये, असे आवाहन बेलापूर मतदारसंघाच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.