ठाणे : महेश आहेर यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या मुख्यालयावर मारहाण झाली होती.. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या सह इतर 7 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यातील 4 कार्यकर्त्यांना नौपाडा पोलिसांनी अटक करण्यात आली होती. या चौघांची 25 हजाराच्या जात मुचलक्यावर ठाणे न्यायालयाने सुटका केली आहे. त्यानंतर ठाणे पोलिसांनी या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना हद्दपारची कारणे दाखवा नोटीस दिली होती.
ऑडिओ क्लिपिंग व्हायरल : बुधवारी सादर प्रकरण हे विधानसभेत डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी उचलून धरल्याने या प्रकरणाच्या आगीला पुन्हा हवा मिळाल्याचे आणि निखारे पेटत असल्याचे दिसत आहे. बुधवारीच सोशल मीडियावर पुन्हा एकदा ठाणे पोलिसांशी महेश आहेर यांनी साधलेल्या संवादाच्या ऑडिओ क्लिपिंग व्हायरल झाल्या आहेत. यात आर्थिक व्यवहार आणि मुख्यमंत्री यांच्या संवादाचा किंवा महेश आहेर यांचा केस ही वाकडा होणार नसल्याचे संवाद असलायची माहिती आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच ठामपा सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्या पाठीशी असलयाचे संवादावरून स्पष्ट होताना दिसत आहे.
ऑडिओ क्लिपिंगने मुख्यमंत्र्यांचे आशीर्वाद आरोप : महेश आहेर हे आपल्यावर मुख्यमंत्र्यांचा वरदहस्त असल्याचे बोलत आहेत. तसेच आपला कोणीही केसही वाकडा करू शकत नाही अशा प्रकारचं भाष्य या ऑडिओ क्लिपमध्ये व्हायरल झालेला आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये त्यांनी त्यांचे आणि मुख्यमंत्र्यांचे संबंध देखील समोर आणले आहेत. या क्लिप नंतर पुन्हा एकदा महेश आहेर आणि राष्ट्रवादीमध्ये वाद उफाळून येण्याची शक्यता दर्शवली जात आहे. येणाऱ्या काळात महेश आहेर, राष्ट्रवादी कार्यकर्ते यांचा संघर्ष अधिकच तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.
व्हायरल क्लिपिंगमध्ये काय आहे संवाद : एका ऑडिओ क्लिपिंगमध्ये महेश आहेर हे पैशाच्या बांदलांच्याबाबत हिशोब देत आहेत. त्यांमुळे हा संवाद नेमका कुणाशी साधत होते. हा प्रश्न समोर उभा राहतो. क्लिपिंगमध्ये महेश आहेर शैलेश नावाच्या व्यक्तीला विचारून शिवीगाळ करताना आढळले आहेत. तर किती रुपयांची किती बेंडाळे हे हि सांगताना क्लिपीं आहे. त्यामुळे हे पैसे दिले कुणाला हा प्रश्न उपस्थित होत असतानाच कशासाठी? हा प्रश्नही उर्वरित आहे.
केसही वाकडा होणार नाही : एका क्लिपिंगमध्ये महेश आहेर समोरच्या व्यक्तीला सांगताहेत. मुख्यमंत्र्यांनी थेट पोलिसांना आदेश दिलेले आहेत. महेश आहेर हा माझा माणूस आहे त्याला हात लावायचा नाही असे सांगितले. तर महेश आहेर म्हणाले साहेबानी सांगितलेले आहे कि घाबरू नको तुझा केसही वाकडा होणार नाही असे क्लिपिंगमध्ये स्पष्ट महेश आहेर बोलताना आढळलंत आहेत.
ऑडियो क्लिप मॉर्फ : माझ्या मोबाईलचा डाटा २०२१ पासून काढून माझ्या मॉर्फ ऑडियो क्लिप बनवल्या जात आहेत असा आरोप महेश आहेर यांनी केला आहे. ठाणे पालिका सहाय्यक आयुक्त आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीला, जावयाला जीवे मारण्याचा कट ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी महेश आहेर यांनी रचला असल्याचे स्वतः आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक कथित कॉल रेकॉर्डिंग वायरल करून घैफ्यास्पोट केला होता. त्यानंतर महेश आहेर यांना मुख्यालयासमोर बेदम मारहाण केली होती. त्यानंतर पुन्हा एकदा आमदार जितेंद्र आवाड यांनी विधान परिषदेत हा मुद्दा उपस्थित करत अनेक प्रश्न उपस्थित केले. दरम्यान, यानंतर महेश आहेर यांनीही मीडियाला प्रतिक्रिया दिली आहे.मी वारंवार सांगत आहे. 2021 पासून माझ्या मोबाईलचा डाटा काढून मोर्फ ऑडिओ क्लिप तयार केल्या जात आहेत. तसेच MMRDA मधील रूम हे भाडे तत्वावर दिले जात असतात तसेच आम्ही जे काही वाटप केले आहे ते वरिष्ठांची पूर्व मान्यता घेऊन केलेले आहे. जर प्रशासनाने त्यावर चौकशी नेमली तर त्याला सामोरे जाण्यास मी तयार आहे, असेही यावेळी आहेर यांनी स्पष्ट केले आहे.
हेही वाचा - Cm On Employees Strike : मुख्यमंत्र्यांचे सरकारी कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचे आवाहन