नवी मुंबई - नवी मुंबईत कोरोनाचा कहर वाढत असून, दिवसेंदिवस कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या वाढत आहे. आजही 64 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत सापडलेल्या कोरोनाबाधीत रुग्णसंख्येत आजचा आकडा हा सर्वाधिक आहे. अत्यावश्यक सेवेत आणि एपीएमसी मार्केटमध्ये कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना व त्यांच्या निकटवर्तीयांना कोरोनाची बाधा होत असल्याचे चित्र नवी मुंबईत दिसून येत आहे.
कोरोनाबाधीत रूग्णांची संख्या पाहता नवी मुंबई शहरात धोक्याची पातळी ओलांडली आहे. नवी मुंबई शहरात आत्तापर्यंत 985 कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आले असून, पैकी 11 हे इतर ठिकाणचे रहिवासी होते. आतापर्यंत नवी मुंबईत 7 हजार 653 लोकांची कोविड 19 ची चाचणी करण्यात आली आहे. यामध्ये 5 हजार 623 जण निगेटिव्ह आले असून, 1 हजार 56 जणांचे तपासणी अहवाल येणे बाकी आहे.
सद्यस्थितीत नवी मुंबई शहरात राहणाऱ्या पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 974 इतकी आहे, आज 64 जण आज (14 मे) कोरोना पॉझिटिव्ह आले असून, तुर्भेमधील 5, बेलापूर मधील 5, कोपरखैरणे मधील 12, नेरुळ मधील 13 व वाशीतील 5, घणसोली मधील 5, ऐरोली मधील 12 व दिघ्यात 7 असे एकूण 64 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. शहरात 974 इतका कोरोनाबाधीत रूग्णांचा आकडा झाला आहे.
आतापर्यंत नवी मुंबईत 255 व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहेत. त्यातील आज नेरूळ मधली 4 ,वाशीमधील 11, तुर्भे येथील 15 ,कोपरखैरणे मधील 20, घणसोली मधील 1 आणि ऐरोली मधील 2 अशा एकूण 53 व्यक्ती कोरोना मुक्त झाल्या आहेत. शहरात सद्यस्थिती मध्ये 699 व्यक्तींवर उपचार सुरू आहेत.