ETV Bharat / state

...तर ठाणे पालिका मुख्यालयाच्या दारातच आंब्यांची विक्री करु; आनंद परांजपेंचा इशारा - mango

पावसाळा तोंडावर आलेला असतानाही नालेसफाईचे काम रेंगाळत पडलेले आहे. मेट्रोच्या बांधकामामुळे शहरात प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. यासारखे अनेक विषय असतानाही भाजपचे नगरसेवक आणि शहराध्यक्ष हे गोरगरीब शेतकर्‍यांना विरोध करुन राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

आनंद परांजपे (राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष )
author img

By

Published : May 10, 2019, 4:56 PM IST

ठाणे - सध्या ठाण्यात आंब्यांवरून राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. ठाण्यातील विष्णु नगर येथे फुटपाथवर आंबे विक्रीचा स्टॉल लावण्यात आला आहे. शेतकरी ते थेट ग्राहक अशा सुविधेचा हा स्टॉल उभारण्यात आला होता. मात्र, भाजपच्या स्थानिक नगरसेवकांनी या कोकणातील शेतकर्‍यांना आंबे विक्रिला विरोध केला आहे. यावर मराठी माणसाचे हे स्टॉल असल्याने हा स्टॉल हटवू नका, अशी भूमिका मनसेने घेतली. यामुळे भाजप आणि मनसेचे कार्यकर्ते आमनेसामने आले होते. यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज केला.या संदर्भात आज आनंद परांजपे यांनी पत्रकार परिषद घेऊन, राष्ट्रवादी काँग्रेस शेतकर्‍यांच्या हितासाठी लढत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना केलेला विरोध आपण सहन करणार नसून त्यांच्या संरक्षणासाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले. यावरून मनसेच्या भूमिकेला राष्ट्रवादीचेही पाठबळ मिळताना दिसत आहे.

आनंद परांजपे (राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष )

परांजपे म्हणाले, सध्या ठाण्यात आंब्यावरुन वातावरण गरम झाले आहे. शहरात भीषण पाणी टंचाई आहे. त्यावर तोडगा काढण्यात सत्ताधार्‍यांना अपयश आले आहे. अतिधोकादायक इमारतींमधील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अजूनही बारगळलेलाच आहे. पावसाळा तोंडावर आलेला असतानाही नालेसफाईचे काम रेंगाळत पडलेले आहे. मेट्रोच्या बांधकामामुळे शहरात प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. यासारखे अनेक विषय असतानाही भाजपचे नगरसेवक आणि शहराध्यक्ष हे गोरगरीब शेतकर्‍यांना विरोध करुन राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

परांजपे पुढे म्हणाले, काल जे घडले ते ठाणे शहरात प्रथमच घडले आहे. किंबहुना ठाण्याची ती संस्कृतीही नाही. गेली 25 वर्षे ठाणे महानगरपालिकेत शिवसेनेच्या साथीने सत्ता उपभोगणार्‍या भाजपला या शहरात राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करता आलेली नाही. अशा स्थितीमध्ये जर शेतकरी आपला शेतमाल थेट विक्री करीत असेल तर सेना-भाजपच्या दावणीला बांधून घेत पालिका प्रशासनानेही या शेतकर्‍यांवर कारवाई करणे सर्वार्थाने चुकीचेच असल्याचेही परांजपेंनी यांनी सांगितले.

भाजपच्या केंद्रातील आणि राज्यातील सरकारला 2 कोटी रोजगार उपलब्ध करुन देता आलेले नाहीत; शेतकर्‍यांना देशोधडीला लावलेले आहे. या अपयशी मोदी सरकारचे प्रतिनिधीत्व करणार्‍या ठाण्यातील भाजप नगरसेवकांनी तरी ठाण्याच्या विकासाचे राजकारण करावे. ठाण्यात येऊन आपला शेतमाल विकणार्‍या शेतकर्‍यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा आहे. या शेतकर्‍यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. त्यांची अडवणूक करु नये. ठामपानेही माणूसकीच्या नात्याने या शेतकर्‍यांवर कारवाई करु नये; अन्यथा, या शेतकर्‍यांना घेऊन आम्ही पालिकेच्या दारात आंबा विक्रीचे स्टॉल लावू, असा इशाराही यावेळी परांजपे यांनी दिला.

Intro: तर ठामपा मुख्यालयाच्या दारातच आंब्यांची विक्री करु
आनंद परांजपे यांचा इशाराBody:
सध्या ठाण्यात आंब्यांवरून राजकारण गरम झालेलं आहे . ठाण्यातील विष्णु नगर येथे फुटपाथवर आंबे विक्रीचा स्टॉल लावण्यात आला आहे, शेतकरी ते थेट ग्राहक सुविधेचा हा स्टॉल उभारण्यात आला होता. भाजपच्या स्थानिक नगरसेवकांनी या कोकणातील शेतकर्‍याला विरोध केला, दरम्यान मराठी माणसाचे हे स्टॉल असल्याने हा स्टॉल हटवू नका अशी भूमिका मनसेने घेतली. यामुळे भाजप आणि मनसेचे कार्यकर्ते आमनेसामने आले होते. यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज केला. या संदर्भात आज आनंद परांजपे यांनी पत्रकार परिषद घेऊन, राष्ट्रवादी काँग्रेस शेतकर्‍यांच्या हितासाठी लढत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना केलेला विरोध आपण सहन करणार नसून त्यांच्या संरक्षणासाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सज्ज असल्याचे सांगितले.
VIO :- सध्या ठाण्यात आंब्यावरुन वातावरण गरम झाले आहे. शहरात भीषण पाणी टंचाई आहे. त्यावर तोडगा काढण्यात सत्ताधार्‍यांना अपयश आले आहे. अतिधोकादायक इमारतींमधील रहिवाशांच्या पुन:र्वसनचा प्रश्न आ वासून उभा आहे. पावसाळा तोंडावर आलेला असतानाही नालेसफाईचे काम रेंगाळत पडलेले आहे. मेट्रोच्या बांधकामामुळे शहरात प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. यासारखे अनेक विषय असतानाही भाजपचे नगरसेवक आणि शहराध्यक्ष हे गोरगरीब शेतकर्‍यांना विरोध करुन राजकारण करीत आहेत. काल जे घडले तर ठाणे शहरात प्रथमच घडले आहे. किंबहुना ठाण्याची ती संस्कृतीही नाही. गेली 25 वर्षे ठामपात शिवसेनेच्या साथीने सत्ता उपभोगणार्‍या भाजपला या शहरात राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची अमलबजावणी करता आलेली नाही. अशा स्थितीमध्ये जर शेतकरी आपला शेतमाल थेट विक्री करीत असेल तर सेना-भाजपच्या दावणीला बांधून घेत पालिका प्रशासनानेही या शेतकर्‍यांवर कारवाई करणे सर्वार्थाने चुकीचेच आहे. भाजपच्या केंद्रातील आणि राज्यातील सरकारला 2 कोटी रोजगार उपलब्ध करुन देता आलेले नाहीत; शेतकर्‍यांना देशोधडीला लावलेले आहे. या अपयशी मोदी सरकारचे प्रतिनिधीत्व करणार्‍या ठाण्यातील भाजप नगरसेवकांनी तरी ठाण्याच्या विकासाचे राजकारण करावे. ठाण्यात येऊन आपला शेतमाल विकणार्‍या शेतकर्‍यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा आहे. या शेतकर्‍यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. त्यांची अडवणूक करु नये. ठामपानेही माणूसकीच्या नात्याने या शेतकर्‍यांवर कारवाई करु नये; अन्यथा, या शेतकर्‍यांना घेऊन आम्ही पालिकेच्या दारात आंबा विक्रीचे स्टॉल लावू, असा इशाराही यावेळी त्यांनी दिला.

BYTE :- आनंद परांजपे (राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष ) Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.